Home /News /pune /

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील सर्वात मोठी बातमी, साक्षीदाराने कोर्टात हल्लेखोरांना ओळखलं

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील सर्वात मोठी बातमी, साक्षीदाराने कोर्टात हल्लेखोरांना ओळखलं

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणा संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.

पुणे, 19 मार्च : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या हत्या प्रकरणा संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणी आज पुणे न्यायालयात साक्षीदारासमोर आरोपींची ओळख परेड झाली. आरोपी सचिन अंदुरे (Sachin Adure) आणि शरद कळसकर (Sharad Kalaskar) यांना खून करताना पाहिलं, अशी साक्ष साक्षीदाराने दिली आहे. या प्रकरणी आज न्यायालयात निम्मी ओळख परेड झाली. उर्वरित पुढील ओळख परेड ही 23 मार्चला होईल. याप्रकरणी वीरेंद्र तांवडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर आरोपी आहेत. यातील संजीव पुनाळेकर वगळता सर्व चार आरोपी न्यायालयात प्रत्यक्ष हजर होते. हत्येतील पाच आरोपींवर शिवाजीनगर येथील नावंदर कोर्टात सी.बी.आय मार्फत 15 सप्टेंबर 2021 रोजी आरोपपत्र निश्चित झाले आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी दोन आरोपींनी हत्या केली होती. पुण्याच्या शनिवार पेठेतील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर दाभोलकरांवर गोळ्या झाडून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे राज्यासह देश हादरला होता. दाभोलकरांचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम संपूर्ण देशभरात पोहोचलं होतं. त्यामुळे त्यांच्या हत्येच्या घटनेमुळे देशभरातील नागरिकांना धक्का बसला होता. या प्रकरणी सुरुवातीला पोलिसांकडे तपास होता. त्यानंतर सीबीआयकडून तपास सुरु होता. तपासाला अनेकवर्ष लागली. त्यानंतर काही आरोपींना पकडण्यात तपास यंत्रणांना यश आलं होतं. अखेर 15 सप्टेंबरला आरोपपत्र निश्चित झाले होते. या प्रकरणी कोर्टात खटला सुरु होता. (पुतिन यांना अन्नातून विष दिलं जाण्याची भीती.. 1000 वैयक्तिक कर्मचाऱ्यांना हटवलं) नरेंद्र दाभोलकर यांची ज्याक्षणी हत्या करण्यात आली त्याचवेळी या प्रकरणातील साक्षीदार हे शनिवार पेठेतील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर साफसफाई करीत होते. साक्षीदाराची महिला सहकारी देखील त्यावेळी तिथे उपस्थि होती. साफसफाईचं काम झाल्यानंतर ते पुलाच्या डिव्हाडरवर बसले होते. पुलाजवळील झाडावर एक माकड आल्याने आणि त्यामुळे कावळ्यांचा आवाज आल्याने त्यांनी त्या बाजूला पाहिले. तेव्हा त्यांनी दोघांनी एका व्यक्तीवर गोळीबार करताना पाहिलं. या गोळीबारात ज्या व्यक्तीवर हल्ला झाला ती व्यक्ती जमीनीवर पडल्याचं त्यांना दिसलं. आरोपी हल्ला करुन पोलीस चौकीच्या बाजूला पळाले होते. त्यानंतर ते दुचाकीवरुन पळून गेले होते. या प्रकरणी अनेक वर्षांपासून तपास पूर्ण झाल्यानंतर 'सनातन' संस्थेशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाचही आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आली होती. याच प्रकरणी न्यायालयात खटला सुरु आहे. न्यायालयात सध्या साक्षीदारांचे साक्ष नोंदविणे सुरु आहे. पुणे महापालिकेत काम करणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शीचा आज साक्ष नोंदविण्यात आली. त्यामुळे आता या प्रकरणी न्यायालय नेमका काय निर्णय देणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या