पुणे, 15 सप्टेंबर : डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) हत्या प्रकरणातील पाच आरोपींच्या विरोधात दोषारोप निश्चित (Charges framed against 5 accused by Pune court) करण्यात आले आहेत. आता या प्रकऱणाची पुढील सुनावणी 30 सप्टेंबर रोजी होणार आहे. न्यायालयाने आरोपी वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, विक्रम भावे यांच्याविरुद्ध हत्येचा कट रचला असल्याचं निश्चित केलं आहे.
आरोपी निश्चित झाल्याने आता आरोपींच्या विरोधात खटला चालवण्यात येणार आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला पाच वर्षे झाल्यानंतर आरोपींना अटक झाली. त्यानंतर आता हत्येच्या आठ वर्षांनंतर आरोपींच्या विरोधात आरोप निश्चित झाले आहेत.
Narendra Dabholkar (in file pic) murder case | Charges framed against 5 accused by Pune court under IPC sec 302 (murder), 120(b), 34 along with sec 16 of UAPA & sec 3(25), 27(1), 27(3) of Arms Act. Framing of charges against accused Sanjeev Punalekar to be done under sec 201 IPC. pic.twitter.com/6IG6tpdMbI
— ANI (@ANI) September 15, 2021
एएनआयच्या मते, आर्थर रोड जेल आणि हर्सुल जेलमध्ये असलेले आरोपी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना पुण्यातील येरवडा सेंट्रल जेलमध्ये स्थलांतरित करण्याचेही न्यायालयाने आदेश दिले आहेत. न्यायालयाने पाचही आरोपींच्या विरोधात आयपीसी 302, 120 बी, 34, यूएपीएच्या सेक्शन 16 आणि सेक्शन 3 (25), 27 (1), 27 (3) अंतर्गत आरोप निश्चित केले आहेत.
20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली होती. आरोपींनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.