मराठी बातम्या /बातम्या /पुणे /'नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू' चंद्रकांत पाटलांनी उडवली पटोलेंची खिल्ली

'नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू' चंद्रकांत पाटलांनी उडवली पटोलेंची खिल्ली

Chandrakant Patil on Nana Patole: वाढत्या इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसकडून संपूर्ण राज्यात आंदोलन करण्यात येत आहे. त्याचवेळी नाना पटोले यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन चंद्रकांत पाटील यांनी नाना पटोलेंवर कडवट टीका केली आहे.

पुणे, 10 जुलै : महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर विखारी टीका करत त्यांना पप्पू (Pappu) म्हणून संबोधले आहे. पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी नाना पटोलेंवर निशाणा साधला आहे. नाना पटोलेंनी केलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.

नेमकं काय म्हटलं चंद्रकांत पाटलांनी?

जरंडेश्वर साखर कारखाना हे हिमनगाचे टोक आहे म्हणत मी जे पत्र अमित शहा यांना दिलं त्यातील कारखान्यांची यादी ही अण्णा हजारे यांनी 5 वर्षांपूर्वीच दिलेली आहे. त्यात नितीन गडकरींचे 2 कारखाने असले तरी त्यात गैरव्यवहार झाला नाही. नाना पटोले म्हणजे महाराष्ट्रातील एक पप्पू आहेत, केंद्रात एक पप्पू आहेत तसे महाराष्ट्रात एक पप्पू (Nana Patole is Pappu of Maharashtra) आहेत. ते काहीही मनाला येईल ते बोलत असतात अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे.

'काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष, काका-पुतण्याच्या ताटाखालचे मांजर नाही' काँग्रेस नेत्याची पवारांवर टीका

जरंडेश्वर साखर कारखान्यात झालेल्या गैरव्यवहारानंतर ईडीने कारखाना जप्तीची कारवाई केली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून राज्यातील साखर कारखान्यांची यादी दिली आहे आणि या 30 कारखान्यांची चौकशी करण्याचं म्हटलं आहे.

मंत्रिमंडळ विस्तारावरुन नाना पटोलेंनी काल भाजपवर टीका केली होती. केवळ रेल्वेचे डबे बदलून फायदा नाही तर इंजिन बदलण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर दिली होती.

सहकार मंत्रालयावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील सहकार चळवळ सुदृढ आणि समृद्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवून सहकार मंत्रालयाची स्थापना केली आहे. केंद्राने लक्ष घातल्यावर राज्यातील सहकार क्षेत्राला त्याचा उपयोगच होतो हा आजवरचा इतिहास आहे.

First published:

Tags: Chandrakant patil, Nana Patole, Pune