मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पंडित जवाहरलाल नेहरूवर टीका करणे राज्यपालांना शोभत नाही, नाना पटोलेंची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल

पंडित जवाहरलाल नेहरूवर टीका करणे राज्यपालांना शोभत नाही, नाना पटोलेंची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल

नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली. तसंच त्यांनी राज्यपालांवरही हल्लाबोल केला आहे.

नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली. तसंच त्यांनी राज्यपालांवरही हल्लाबोल केला आहे.

नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली. तसंच त्यांनी राज्यपालांवरही हल्लाबोल केला आहे.

पुणे, 01 ऑगस्ट: पुण्यात (Pune) नाना पटोले (Nana Patole) यांच्या हस्ते पूरग्रस्तांना आज मदत पाठवण्यात आली. सारसबाग चौकामध्ये अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करत नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. कोल्हापूर पूर पाहणीदरम्यान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांची भेट झाली होती. या भेटीबाबत काँग्रेसच्या मनात कुठलीही शंका नाही. काँग्रेस सरकारची जासूसी करत नाही ते काम केंद्राचा आहे, केंद्र ते करतंय असं बोलत केंद्र सरकारवर टीका केली. तसंच त्यांनी राज्यपालांवरही हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला मदत करावी अशी अपेक्षा आहे ते काय मदत करतात ते पाहू वादळाच्या वेळेस त्यांनी गुजरातला भेट दिली. मात्र महाराष्ट्राला भेट दिलेली नाही. त्यामुळे आता पूर परिस्थितीत मोदी काय मदत करतील हे पाहावे लागेल, असं नाना पटोले म्हणाले आहेत. पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तेव्हा मेट्रोचा पाया रोवला गेला. म्हणून आज या पक्षाने सात वर्षे देश मागे नेला आहे. त्याला श्रेय घ्यायचा असेल तर त्यांना लखलाभ असं म्हणत त्यांनी भाजप सरकारवर टीका केली. त्याचबरोबर मातंग समाजाच्या विविध मागण्यांचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला आहे आणि त्याचा पाठपुरावा मी करणार आहोत असंही नाना पटोले यांनी सांगितलं. ट्वीट करत संजय राऊत यांनी दाखवली प्रसाद लाड यांची पातळी पटोलेंचा राज्यापालांना टोला एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली होती. नेहरूंच्या धोरणामुळे देश कुमकुवत झाल्याची टीका राज्यपालांनी केली होती. त्यावर नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पंडित जवाहरलाल नेहरूवर टीका करणे राज्यपाल यांना शोभत नाही.टीका करायची तर खुर्ची सोडा, मग आम्ही बघू, असा टोला पटोले यांनी राज्यपालांना लगावला आहे. राज्यपालांनी भाजपचा कार्यकर्ता बनावं, मग त्यांनी स्वातंत्र्य आहे का, यावर बोलावं, असंही नाना पटोले म्हणालेत. देवेंद्र फडणवीसांच्या या 26 मागण्या मुख्यमंत्री मान्य करणार? पुढे नाना पटोले म्हणाले की, राज्यपालांच्या खुर्चीवर बसून अशा प्रकारची टीका करण्याचे अधिकार राज्यपालांना नाही. ते भगतसिंह कोश्यारी म्हणून बोलत असतील. तो त्यांचा अधिकार आहे. मग त्यांना ती खुर्ची सोडावी लागेल. मग आम्ही त्यांना उत्तर काय द्यायचे ते निश्चित देऊ.
First published:

Tags: Governor bhagat singh, Nana Patole

पुढील बातम्या