मुंबईला हादरवणारा डॉन मन्या सुर्वे हा माझा भाऊ, नाना पाटेकरांचा मोठा खुलासा

मुंबईला हादरवणारा डॉन मन्या सुर्वे हा माझा भाऊ, नाना पाटेकरांचा मोठा खुलासा

'मला बलात्काऱ्याचा रोल कधीच करता आला नसता, मला तसा एक रोल मिळाला होता तो मी नाकारलेला. माफीचा साक्षीदार मधील जक्कल चा रोल मला करायला नको होता आता असं वाटते.'

  • Share this:

गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड 22 जानेवारी : पिंपरी चिंचवड कलारंग सांस्कृतिक कला संस्थेच्या 21 व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर ह्यांची प्रकट मुलाखत आज घेण्यात आली. या मुलाखतीत नानांनी आपल्या खास शैलीत सर्वच प्रश्नांना तडाखेबंद उत्तर दिलीत. यावेळी त्यांनी खासगी आयुष्य, समाजकारण, चित्रपट, राजकारण, सध्याची परिस्थिती अशा सगळ्याच विषयांवर दिलखुलास उत्तरं दिली. यातून नाना पाटेकरांच्या आयुष्यातल्या आत्तापर्यंत कधीही बाहेर न आलेल्या अनेक गोष्टी नानांनी सांगितल्या आणि प्रेक्षकांनीही त्याला तशीच भरभरून दाद दिली आणि ही मुलाखत नानांनी जिंकून घेतली.

नाना म्हणाले, पिंपरी चिंचवड मध्ये एका बांधकामावर मी मुकादम होतो कामगारांचे पगार द्यायचो त्यामुळे माझे ऋणानुबंध आहेत या शहराशी. येरवड्यात गेल्या नंतर मी 450 खुन्याना बोललो, प्रत्येकाने क्षणिक रागातून कृत्य केलं होतं आणि त्यांच्या आयुष्याच्या प्राईम टाईम ते जेल मध्ये घालवतात "तो" रागाचा क्षण" सांभाळा पाहिजे.

मन्या सुर्वे हा माझा भाऊ,मामांचा मुलगा होता असंही नानांनी सांगितलं. गुन्हेगारी भूमिके बद्दल बोलतांना त्यांनी ही आठवण सांगितली. एकेकाळी मुंबईत मन्या सुर्वेची दहशत होती. त्याच्यावर हिंदी चित्रपटही निघाला आहे.

आणखी काय म्हणाले नाना पाटेकर?

थोडासा रुमानी हो जाये मधील रोलच्या आठवणी सांगताना त्यांनी अमोल पालेकरांची मिमिक्रीही केली. एन. चंद्रा, चंद्रशेखर नार्वेकर हे मराठी नाव स्वीकारायला त्या वेळी कुणी तयार नव्हते म्हणून त्यांनी चिडून स्वतःच नामकरण केलं, ह्या माणसाचं खूप योगदान आहे माझ्या आयुष्यात.

अश्लिल VIDEO योग ग्रुपवर टाकणारा आंबट शौकीन शिक्षक निलंबित

पैसे नको देऊ, खांद्यावर हात ठेवा, आकाशातला बाप रुसला म्हणून आमची अशी अवस्था, कर्जमाफी नकोच भीक देताय का, कांद्याचे भाव वाढले म्हणून नका चिडू, तुमचं महिन्याच गणित बिघडेल पण त्यांच्या आयुष्याच बिघडते. आत्महत्या खूप कमी झाल्या, वैफल्य कमी झालं हे नाम चं काम करतांना जाणवलं.

एका रोल मधून दुसऱ्या रोल साकारतांना आम्ही कलाकार म्हणून समोर येतो मात्र घरच्यांना वेळ देऊ शकत नाही आणि जेव्हा आम्ही परत येतो तेव्हा मुलं मोठी झालेली असतात आणि आमचा नटसम्राट होतो.

CM उद्धव ठाकरेंचं पुन्हा 'जय श्रीराम', खासदारांना घेऊन धडकणार अयोध्येत

शरद पवार माझे हिरो होते, मी त्यांना एकदा सहज म्हणालो होतो की तुम्ही राजकारणातले चाणक्य आहात, पण एवढ्या वर्षात एकही चंद्रगुप्त तयार केला नाही, पण नंतर लक्षात आलं चाणक्यही तेच आणि चंद्रगुप्तही तेच आहेत. खूप मोठा माणूस कॅन्सर सारख्या आजाराला परत पाठवलं या माणसाने. खड्डे का बुजवले नाही म्हणून ओरडू नका, तुम्ही तुम्हाला दिसणारा खड्डा बुझवा.

रस्त्याच्या टेंडरवरून शिवसेनेच्या आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

स्मिता पाटील ह्यांच्यामुळे चित्रपट क्षेत्रात आलो चित्रपट माध्यम मला फार आवडायचं नाही. कलाकार त्याच्या अनुभवानुसार अभिनय करत असतो, मी जे भोगलंय ते माझ्या अभिनयात उतरलं.

मला बलात्काऱ्याचा रोल कधीच करता आला नसता, मला तसा एक रोल मिळाला होता तो मी नाकारलेला. माफीचा साक्षीदार मधील जक्कल चा रोल मला करायला नको होता आता असं वाटते,मला तशा भूमिकेत जायला आवडत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 22, 2020 07:38 PM IST

ताज्या बातम्या