मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

भीमा नदीतील मृत्यूकांडाचा गूढ उलगडलं? पुण्याच्या कुटुंबातील 7 जणांनी संपवलं जीवन, खळबळजनक कारण

भीमा नदीतील मृत्यूकांडाचा गूढ उलगडलं? पुण्याच्या कुटुंबातील 7 जणांनी संपवलं जीवन, खळबळजनक कारण

पुण्याच्या कुटुंबातील 7 जणांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे.

पुण्याच्या कुटुंबातील 7 जणांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे.

पुण्याच्या कुटुंबातील 7 जणांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  Meenal Gangurde

पुणे, 24 जानेवारी : मुलगी पळवून नेल्याच्या रागात वडिलांसह कुटुंबातील 7 जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. दौंड तालुक्यातून गेलेल्या भीमा नदी पात्रातील पारगाव हद्दीत मागील सहा दिवसांपासून अनेक मृतदेह आढळून आले होते. आता त्याचा आकडा सातपर्यंत पोहोचला आहे.

मयताच्या मुलाने मुलगी पळवून नेली होती. त्याने मुलगी परत न आणल्याने वडिलांसह अन्य 6 जणांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती समोर आली आहे. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथील कुटुंबाने भीमा नदीत आत्महत्या केली. पती-पत्नी, मुलगी आणि जावई यांच्यासह त्यांच्या 3 मुलींचे मृतदेह भीमा नदीत सापडले होते. त्यावेळी घातपात की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलीस चौकशीनंतर आत्महत्या असल्याचं समोर आलं आहे. 17 जानेवारीच्या रात्री 7 जणांनी भीमा नदीत आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. एबीपीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

भीमा नदीत मृत्यूतांडव, एकापाठोपाठ सापडले 5 मृतदेह, आज 14 वर्षांच्या मुलगा सापडला

मोहन उत्तम पवार, संगिता मोहन पवार, राणी शाम फुलवरे, शाम फुलवरे अशी यातील चार मृत व्यक्तींची नावे आहेत.  हे कुटुंब मंगळवारी 17 जानेवारी रोजी रात्री अकरानंतर वाहनाने निघोज या गावातून निघाले होते. शिरूर - चौफुला रोडवर असलेल्या दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत भीमा नदीच्या पात्रात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृतदेह आढळून आले होते. 18 जानेवारी रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर 20, 21 आणि  22 जानेवारी रोजी तीन मृतदेह आढळून आले होते. या घटनेचा पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

First published:

Tags: Crime, Pune, Shocking news