• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • 'सत्ताधारी आणि विरोधकांचं चांगलं चाललंय', राजू शेट्टींची शेलक्या शब्दात टीका

'सत्ताधारी आणि विरोधकांचं चांगलं चाललंय', राजू शेट्टींची शेलक्या शब्दात टीका

'या कष्टकऱ्यांच्या पाठीमागे ना विरोधीपक्ष ना सत्ताधारी उभे राहतात. दोन्ही पक्षांनी शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलंय'

'या कष्टकऱ्यांच्या पाठीमागे ना विरोधीपक्ष ना सत्ताधारी उभे राहतात. दोन्ही पक्षांनी शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलंय'

'या कष्टकऱ्यांच्या पाठीमागे ना विरोधीपक्ष ना सत्ताधारी उभे राहतात. दोन्ही पक्षांनी शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलंय'

  • Share this:
आंबेगाव, 01 नोव्हेंबर : मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणावरुन (Mumbai Cruise Drugs Case) महाविकास आघाडी सरकार (mva government) आणि भाजपमध्ये (bjp) कलगीतुरा रंगला आहे. 'राज्यात राजकीय नेत्यांचे टोळीयुद्ध सुरू झालंय. यातून एकमेकांचे कपडे उतरविण्याचे काम सुरू आहे. जनताही यांची मजा घेतेय चाललंय ते चांगलं चाललंय' असं म्हणत माजी खासदार राजू शेट्टींनी ( Raju Shetty) शेलक्या शब्दांत टीका केली. आज राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी थेट भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा एका ड्रग्स पेडलरसोबतचा फोटो ट्वीट केला आहे. त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे.  पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात पेठ इथं पत्रकारांशी बोलत असताना राजू शेट्टी यांनी आपली भूमिका मांडली. VIDEO : Tata Punch ची डिलीव्हरी घेताना घडली मोठी चूक; नवी कार झाली खटारा! 'आम्ही मत देऊन ज्यांच्या ताब्यात राज्याचा कारभार दिलाय ते काय लायकीचे आहेत हेच या टोळीयुद्धातून राज्यातील जनतेला कळत चाललंय, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली. तसंच, आज महाराष्ट्रातील शेतकरी, पाऊसाची अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे अडचणीत आला आहे, त्या शेतकऱ्याला मदतीची गरज आहे अशातच या कष्टकऱ्यांच्या पाठीमागे ना विरोधीपक्ष ना सत्ताधारी उभे राहतात. दोन्ही पक्षांनी शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलंय.  शेतकऱ्यांचे मुलभूत प्रश्नाचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी एकमेकांवर आरोप करत राजकीय टोळीयुद्ध सुरू आहे, अशी टीकाही राजु शेट्टी यांनी केली. महाविकास आघाडी सरकारला सत्तेचा माज -सदाभाऊ खोत तर दुसरीकडे, ऊस उत्पादक शेतकरी यांच्या विविध मागण्यांसाठी आज रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने साताऱ्यात ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रयत क्रांती संघटनेचे नेते संस्थापक सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. सारा-जान्हवीची केदारनाथ तीर्थयात्रा सोशल मीडियावर हिट; फोटो व्हायरल 'महाविकास आघाडीला सत्तेचा माज आला असून तो जिरवण्याची वेळ आली आहे. सरकारला शेतकरी महत्वाचा नसून मुंबईमध्ये बसून रोज एक कोंबडा बोंबायला आणि रोज एक गाढव बांग द्यायला लागले. या गाढवाचा हातात दांडक घेऊन बंदोबस्त करायला लागेल' अशा शब्दांत खोत यांनी सरकारवर टीका केली आहे. 'लुटारू सत्तेत बसलेले असून सहकारमंत्री स्वयंभू मंत्री नसून त्याचं दावं एकाच्या हातात आणि एक जण वैरण पाणी टाकत असतो. सहकार मंत्री  शिकवलेल्या पाठीवर वाचून निर्णय देतो, असा एकेरी उल्लेख करत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावरही खोत यांनी टीका केली.
Published by:sachin Salve
First published: