Home /News /pune /

पुण्यात हत्येचं सत्र सुरूच, पोलीस निरीक्षकाच्या आईची हत्या

पुण्यात हत्येचं सत्र सुरूच, पोलीस निरीक्षकाच्या आईची हत्या

एपीएमसी परिसरातील गटारामध्ये एक पिशवी आढळून आली होती. या पिशवीतून दुर्गंधी येत होती.

एपीएमसी परिसरातील गटारामध्ये एक पिशवी आढळून आली होती. या पिशवीतून दुर्गंधी येत होती.

पुण्यात खूनाची पाचवी घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

पुणे, 08 मे : पुण्यात (Pune Lockdown) कडक लॉकडाउनमध्ये पोलीस हवालदाराची (Pune Police) गळा चिरुन निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना  वारजे माळवाडी (warje malwadi) परिसरात सहायक पोलीस निरीक्षकाच्या आईचा खून झाला आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. वारजे माळवाडी भागात रामनगर भाजीमंडईजवळ शनिवारी पहाटे 4 वाजता ही घटना घडली.  शाबाई अरुण शेलार (वय.65,रा. रामनगर) असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. अज्ञात व्यक्तीने डोक्यात लोखंडी रॉड मारून त्यांचा खून करण्यात आला असावा असा अंदाज पोलिसांन वर्तवला आहे. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सकाळी जेव्हा भंगार विक्री करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीच्या हा प्रकार निदर्शनास आला.  पुण्यात खूनाची पाचवी घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. सातारा पोलीस दलालीत सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल अरुण  शेलार यांच्या त्या आई होत्या. IPL 2021 गाजवल्यानंतर आवेश खान इंग्लंडला जाणार, 'या' दोघांना दिलं यशाचं श्रेय पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शाबाई यांचा भंगारचा व्यवसाय आहे. त्या दुकानातच वास्तव्य करत होत्या. सकाळी भंगार विक्री करण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्याने त्याची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेऊन तपासाला सुरूवात केली. श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान, शेलार यांचा खून कोणत्या कारणातून झाला हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलीस हवालदाराची गळा चिरुन हत्या दरम्यान, 5 मे रोजी पुण्यातील फरासनखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस हवालदार समीर सय्यद यांनी मंगळवारी रात्री 1 वाजता प्रवीण महाजन यांनी चाकूने गळा चिरून हत्या केली. समीर सय्यद (वय 48) हे बंदोबस्त आटोपून घरी चालले होते. सय्यद हे खडक पोलीस लाईनमध्ये राहायला होते. सय्यद हे श्रीकृष्ण टॉकीजवळ पोहोचले असता प्रवीण महाजनने याने त्यांच्यावर हल्ला केला आणि चाकूने गळा चिरला. 4 मुलांच्या आईचं जडलं 22वर्षीय तरुणावर प्रेम; लग्नगाठ बांधण्याआधीच सगळं उद्धवस्त घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरून प्रवीण महाजनला अटक करण्यात आली आहे. प्रवीण महाजन हा एक वर्षासाठी तडीपार आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. समीर सय्यद हे आरोपी कुख्यात गुंड प्रवीण महाजन याच्याशी प्रेमसंबंध असलेल्या महिलेला संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत होते. त्यावरून महाजन आणि सय्यद यांच्यात दीड महिन्यापूर्वी जोरदार वादावादीही झाली होती. तोच राग डोक्यात धरून महाजन याने सय्यद यांचा खून केला, असल्याची चर्चा पोलीस दलात आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या