मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

ब्लाउजने गळा आवळून सासूचा खून, मुलाने आणि सुनेनं मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला!

ब्लाउजने गळा आवळून सासूचा खून, मुलाने आणि सुनेनं मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला!

जन्मदात्या आईच्या खुनात मोठया मुलाचा सहभाग असल्याने शहरात खुनाच्या घटनेप्रकरणी नागरीकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

जन्मदात्या आईच्या खुनात मोठया मुलाचा सहभाग असल्याने शहरात खुनाच्या घटनेप्रकरणी नागरीकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

जन्मदात्या आईच्या खुनात मोठया मुलाचा सहभाग असल्याने शहरात खुनाच्या घटनेप्रकरणी नागरीकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

  • Published by:  sachin Salve

आनिस शेख, प्रतिनिधी

मावळ, 24 मे: सासू-सुनेच्या होणाऱ्या किरकोळ वादातून संताप अनावर झाल्याने 22 वर्षीय सुनेने आपल्या पतीच्या मदतीने 45 वर्षीय सासूचा (Mother-in-law) ब्लाउजने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील  (Pune) तळेगाव शहरातील टेल्को हाऊसिंग सोसायटीत घडली आहे. या घटनेप्रकरणी सून पूजा शिंदे तसेच तिचा पती मिलिंद शिंदे या दोघांना तळेगाव पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी पूजा आणि तिची मयत सासू बेबी शिंदे या दोघींमध्ये कडाक्याचे भांडण झाले त्यानंतर राग अनावर झाल्याने पूजाने घरातील कापडी ब्लाउजच्या साह्याने सासू बेबी हिचा गळा आवळला. तसंच ती निपचित पडल्यावर संबंधित घटना आपला पती मिलिंद यास सांगितली दोघांनी संगणमत करून मृत्यूमुखी पडलेल्या बेबी शिंदे हिचा मृतदेह एका प्लास्टिकच्या पोत्यात भरला आणि कोणालाही संशय येऊ नये म्हणून मृतदेह घराच्या छतावर एका कोपऱ्यात ठेवला.

फक्त 20 रुपयांसाठी तरुणाची चाकूने सपासप वार करून हत्या, उल्हासनगर हादरलं

दोन दिवसानंतर मृतदेह कुजू लागल्याने तसंच त्याची दुर्गंधी इतरत्र पसरू लागल्याने आपण केलेला गुन्हा उघडकीस येईल या भीतीपोटी दोघांनी मृतदेह उचलून जवळच असलेल्या एका निर्जन ठिकाणी झाडा झुडपात फेकून दिला. परंतु पोत्या मधून येणाऱ्या दुर्गंधीने टेल्को कॉलनी येथील रहिवाशांचा संशय बळावला, त्यांनी तात्काळ ही घटना तळेगाव पोलिसांना कळविली.

पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होत शहानिशा केली असता पोत्यामध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला संबंधित मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर चौकशीसाठी मयत महिलेची सून पूजा शिंदे हिला ताब्यात घेतले. सुरुवातील तिने उडवाउडवीची उत्तर दिली, पण सासूच्या भांडणाला आणि त्रासाला कंटाळून तिने गळा आवळून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. या संपूर्ण प्रकरणात पती मिलिंद याचा ही सहभाग असल्याचे पूजाने पोलिसांना सांगितले. संबंधित खुना प्रकरणी मयत महिलेचा धाकटा मुलगा अमित शिंदे याने तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी सोडली नोकरी; पतीसोबत सुरू केली समाजसेवा

जन्मदात्या आईच्या खुनात मोठया मुलाचा सहभाग असल्याने शहरात खुनाच्या घटनेप्रकरणी नागरीकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

First published: