पुण्यात अल्पवयीन मुलीला लॉजवर बोलावून प्रियकराने ब्लेडने वार करुन केला खून

प्रेमप्रकरणातून प्रियकराने अल्पवयीन प्रेयसीवर ब्लेडने वार करुन तिचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 5, 2019 02:19 PM IST

पुण्यात अल्पवयीन मुलीला लॉजवर बोलावून प्रियकराने ब्लेडने वार करुन केला खून

अनिस शेख,(प्रतिनिधी)

मावळ, 5 सप्टेंबर: प्रेमप्रकरणातून प्रियकराने अल्पवयीन प्रेयसीवर ब्लेडने वार करुन तिचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे. मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे येथे बुधवारी (4 सप्टेंबर) सायंकाळी ही घटना उघडकीस आली आहे. आरोपी श्रीराम गिरी हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. या घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीराम सुग्रीव गिरी असे आरोपीचे नाव आहे. मावळ तालुक्यातील वडगाव येथील निसर्गवारा लॉजवर दोघे रूम क्रमांक 303 मध्ये सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास थांबले होते. काही कारणावरून दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. श्रीराम गिरी यांने त्याच्याकडील ब्लेडने प्रेयसीचा हात, गळा आणि पोटावर सपासप वार केले. अतिरक्तस्त्रावामुळे मुलीचा रूममध्येच मृत्यू झाला. घटनेनंतर आपोरीने तिथून पोबारा केला आहे. आरोपी घाईघाईत लॉजमधून जात असताना लॉजच्या एका कर्मचाऱ्याने त्याला हटकले. परंतु प्रेयसी तयारी करुन खाली येत असल्याचे सांगून त्याने दुचाकीवरुन पळ काढला.

इंद्रायणीच्या काठावर सापडली आरोपीचा दुचाकी..

फरार आरोपी श्रीराम गिरी याच्या शोधासाठी पोलिसांची सहा पथके तयार करून त्याच्या शोधासाठी रवाना केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे. रात्री उशिरा वडगाव मावळ पोलीस ठाण्यात या खुनासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. वडगाव मावळ पोलिसांचे पथक आरोपीचा शोध घेत आहेत. या दरम्यान आरोपीची दुचाकी इंद्रायणी नदीकाठी सापडली आहे. त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून एनडीआरएफ पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

Loading...

VIDEO: कंबरेपर्यंत पाण्यात अडकलेल्या स्कूलबसमधील चिमुकल्यांच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 5, 2019 02:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...