Home /News /pune /

पुण्यातील बुधवार पेठेत देहविक्री करणाऱ्या महिलेची हत्या, काही अंतरावर पोलिसाचाही खून

पुण्यातील बुधवार पेठेत देहविक्री करणाऱ्या महिलेची हत्या, काही अंतरावर पोलिसाचाही खून

ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणापासून अवघ्या 50 मिटर अंतरावर पोलीस उपनिरीक्षक समीर सय्यद यांचा खून करण्यात आला आहे.

पुणे, 05 मे : पुण्यात (Pune) कोरोनामुळे कडक लॉकडाऊन ( Pune Lockdown) आणि रात्रीची संचारबंदी असताना फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत (Faraskhana Police Station) दोन खुनाच्या घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बुधवार पेठेत (pune budhwar peth) एका देहविक्री करणाऱ्या महिलेचा (Sex Worker) धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. पुण्यातील कुप्रसिद्ध असलेल्या बुधवार पेठेतील  बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकीजवळ मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. एका देहविक्री करणाऱ्या महिलेचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार करून हत्या केली आहे. मुख्य रस्त्यापासून लगतच असलेल्या भागात ही घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणापासून अवघ्या  50 मिटर अंतरावर पोलीस उपनिरीक्षक समीर सय्यद यांचा खून करण्यात आला आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची Fertility वयाबरोबर कमी का होते? कुठलं वय योग्य? फरासखाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक समीर सय्यद (वय 48) हे बंदोबस्त आटोपून घरी चालले होते. सय्यद हे खडक पोलीस लाईनमध्ये राहायला होते. सय्यद हे श्रीकृष्ण टॉकीजवळ पोहोचले असता प्रवीण महाजनने त्यांचा खून केला. नेमका हा खून का आणि कशासाठी केला याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरून प्रवीण महाजन याला अटक करण्यात आली आहे. सय्यद यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. कोरोनाच्या Rtpcr स्वॅब स्टिकची असुरक्षिपणे घराघरात पॅकिंग, उल्हासनगरमधील प्रकार प्रवीण महाजन हा एक वर्षासाठी तडीपार आहे. त्याच्या वरती अनेक गुन्हे दाखल आहेत. सय्यद आणि महाजन यांच्या मध्ये काही वाद होता का किंवा हत्येचे कारण काय आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.  महाजन तडीपार असून हत्यार सोबत घेऊन शहराच्या मध्यवस्तीत आला तोपर्यंत पोलीस काय करत होते असा प्रश्न आहे. या दोन्ही प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या