Home /News /pune /

मुलगा समजून झोपलेल्या बापावरच केले कोयत्याने सपासप वार, पुण्यातील धक्कादायक घटना

मुलगा समजून झोपलेल्या बापावरच केले कोयत्याने सपासप वार, पुण्यातील धक्कादायक घटना

ते संभाषण उत्कर्ष ढेरे याने रेकॉर्डिंग करुन गणेश रोडे याला इतरांना पाठविले होते. याच कारणावरून

शिरुर, 07 मे : दोन मित्रांमधील संभाषण रेकोर्ड कॉल ( phone call record) व्हायरल केला म्हणून मारायला गेलेल्या आरोपीने मुलगा समजून वडिलांनाच ठार केल्याची घटना पुणे (pune) जिल्ह्यातील शिरुर (shirur) तालुक्यातील रांजणगावात एमआयडीसी परिसरात बाभुळसर खुर्द गावात घडली आहे. रात्रीच्या वेळी घरासमोरील ओट्यावर झोपलेल्या वडिलांची यात निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील बाभुळसर खुर्द येथे घरासमोरील ओट्यावर आंथरुन टाकून झोपलेल्या जालिंदर सुदाम ढेरे यांना  कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून त्यांच्या छातीवर, गळ्यावर, हातावर आणि पाठीवर धारदार हत्याराने वार करून त्यांना गंभीर जखमी करुन त्यांचा खून केल्याची घटना 5 मे रोजी घडली होती. (केदारनाथचा प्लान करताय?, जाण्यापूर्वी जाणून घ्या हेलिकॉप्टर सुविधेची माहिती) मयत जालिंदर ढेरे यांची पत्नी अर्चना जालिंदर ढेरे यांनी फिर्याद दिल्याने अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र सदरगुन्ह्यातील आरोपीने कोणत्याही प्रकारचा पुरावा ठेवलेला नसतांना आणि आरोपी बाबत निश्चित अशी कोणतीही ठोस माहिती नसतांना सदरचा गुन्हा उघड करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. सदर घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळावर तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी  यशवंत गवारी व पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी पोलीस स्टाफसह भेट दिली.पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांचे सुचनांप्रमाणे घटनास्थळास स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी त्यांचे तपास पथकासह घटनास्थळास भेट देवून माहिती संकलित करून गुन्हा उघडिकस आणण्याचे प्रयत्न सुरु केले. रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन कडील तपास पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथक असे सदर गुन्हयाचा समांतर तपास करत असतांना रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे, सहा. फौज दत्तात्रय शिंदे, पो. हवा. वैभव मोरे, पो.कॉ. विजय शिंदे, पो. कॉ. उमेश कुतवळ यांनी रात्रभर बाभुळसर व कई परिसरात ठाण मांडून मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे 6 मे रोजीचे पहाटे 7 वाजता गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी निखिल सतिष थेऊरकर (वय 19 वर्षे) याला ताब्यात घेवून पोलीस खाक्या दाखविताच त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. (Credit Card च्या कर्जाचा बोजा कसा कमी करा?) गुन्ह्यातील मयताचा मुलगा उत्कर्ष जालिंदर ढेरे आणि आरोपी निखील थेऊरकर यांच्यामध्ये काही दिवसापूर्वी कर्डे  गावचा माजी उपसरपंच  गणेश रोडे याचा खून करण्याबाबत फोनवरून संभाषण झाले होते. ते संभाषण उत्कर्ष ढेरे याने रेकॉर्डिंग करुन गणेश रोडे याला इतरांना पाठविले होते. याच कारणावरून उत्कर्ष ढेरे आणि निखिल थेऊरकर यांच्यामध्ये वाद झाला होता. त्यामुळे निखील थेऊरकर हा उत्कर्ष ढेरे याला मारण्याच्या तयारीमध्ये सोबत धारदार कोयता घेवून उत्कर्ष ढेरे याच्या घरी आला होता. त्यावेळी उत्कर्ष ढेरे हाच घरासमोर अंधारामध्ये झोपलेला आहे असे समजून आरोपी नामे निखील थेऊरकर याने जालिंदर सुदाम ढेरे यांच्यावर त्याच्याकडील कोयत्याने वार करुन त्यांस गंभीर जखमी करुन खून केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी निखिल सतिश थेऊरकर (वय 19 वर्षे) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या