पुणे महापालिकेवर भाजपचा झेंडा, महापौरपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड

पुणे महापालिकेवर भाजपचा झेंडा, महापौरपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड

भाजपचे दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्यानं चर्चेला उधाण आले होते.

  • Share this:

पुणे,22 नोव्हेंबर:पुणे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. महापौरपदी भाजपचे मुरलीधर मोहोळ यांची निवड झाली आहे. मुरलीधर मोहोळ यांनी महाविकासआघाडीचे प्रकाश कदम यांचा 38 मतांनी पराभव केला. दरम्यान, बैठकीला भाजपचे दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्यानं चर्चेला उधाण आले होते.

महापौरपदासाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना तर उपमहापौरपदासाठी सरस्वती शेंडगे यांनी अर्ज दाखल केला होता. महाआघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रकाश कदम आणि काँग्रेसच्या चांदबी नदाफ यांनी अर्ज दाखल केला आहे.

महापालिकेच्या मुख्य सभागृहात शुक्रवारी सकाळी ही निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांनी आघाडीच्या बाजूने मतदान केले. मनसेच्या दोन्ही नगरसेवकांनी तटस्थ भूमिका मांडली. एमआयएमच्या नगरसेविका यांच्यासह 5 नगरसेवक मतदानावेळी अनुपस्थित राहिले. यानंतर महापौरपदासाठी मुरलीधर मोहोळ 97, महाशिवआघाडीचे महापौर पदाचे उमेदवार प्रकाश कदम यांना 59 मते मिळाली. उपमहापौर पदाच्या भाजपच्या उमेदवार सरस्वती शेंडगे यांना 97 आणि आघाडीच्या उपमहापौरपदाच्या चांदबी नदाफ 59 यांना एवढी मते मिळाली. या मतांच्या आकडेवारीवरून महापौरपदी भाजपचे मुरलीधर मोहोळ, उपमहापौर पदी सरस्वती शेंडगे यांची निवड झाली. तर यावेळी मावळ त्या महापौर मुक्ता टिळक आणि उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांचा विशेष सत्कार केला.

पुणे महापालिकेतील बलाबल...

भाजप- 99

राष्ट्रवादी- 42

काँग्रेस-10

शिवसेना- 10

मनसे- 2

एमआयएम-1

लातूरमध्ये भाजपला मोठा धक्का..

लातूर महानगरपालिकेत भाजपला मोठा धक्का बसला आहे. बहुमतात असतानाही ताब्यात असलेले महापौर पद भाजपला गमवावे लागले आहे. महापौरपदी कॉंग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे यांची निवड झाली आहे. विक्रांत गोजमगुंडे यांनी भाजपचे शैलेश गोजमगुंडे यांचा पराभव केला.

भाजपचे नगरसेवक फुटले...

भाजपच्या दोन नगरसेवकांनी काँग्रेसला मतदान केल्याने सत्ताधारी भाजपवर पराभवाची नामुष्की ओढवली आहे. लातूर महानगरपालिकेत भाजप-35, कॉंग्रेस- 33 आणि राष्ट्रवादी-01 असे होते पक्षीय बालाबल आहे. दरम्यान, अडीच वर्षातच महापालिकेत सत्तांत्तर झाले. महापौर निवडीच्या बैठकीत काँग्रेसचा एक नगरसेवर अनुपस्थित होता. तर भाजपच्या एका सदस्याचे निधन झाले आहे. त्यामुळे एकून 68 सदस्यांनी हात उंच करून मतदान केले. विक्रांत गोजमगुंडे यांना 35 मते मिळाली. महापालिकेबाहेर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून मोठा जल्लोष केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 22, 2019 01:39 PM IST

ताज्या बातम्या