मराठी बातम्या /बातम्या /पुणे /VIDEO: 'दहावी-बारावीच्या परीक्षा Online च घ्या, अन्यथा...'; विद्यार्थ्यांचं मुंबई, पुण्यात आंदोलन

VIDEO: 'दहावी-बारावीच्या परीक्षा Online च घ्या, अन्यथा...'; विद्यार्थ्यांचं मुंबई, पुण्यात आंदोलन

HSC Student Agitation: विद्यार्थ्यांनी मुंबई आणि पुण्यात शुक्रवारी आंदोलन केलं. परीक्षा ऑनलाइन घ्यावात अशी प्रमुख मागणी आंदोलक विद्यार्थ्यांची आहे.

HSC Student Agitation: विद्यार्थ्यांनी मुंबई आणि पुण्यात शुक्रवारी आंदोलन केलं. परीक्षा ऑनलाइन घ्यावात अशी प्रमुख मागणी आंदोलक विद्यार्थ्यांची आहे.

HSC Student Agitation: विद्यार्थ्यांनी मुंबई आणि पुण्यात शुक्रवारी आंदोलन केलं. परीक्षा ऑनलाइन घ्यावात अशी प्रमुख मागणी आंदोलक विद्यार्थ्यांची आहे.

पुणे/मुंबई, 2 एप्रिल: दहावी-बारावीच्या (Class X XII board exam online) परीक्षा तोंडावर आल्या असतानाच कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. कोरोनाचा वाढता फैलाव पाहता विद्यार्थ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. ऑफलाइन परीक्षा (Board exam online) घेतल्यास विद्यार्थ्यांना कोरोनाची (Coronavirus) लागण होण्याची दाट शक्यता आहे. यासाठी ऑनलाइनच परीक्षा घ्या या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी मुंबई आणि पुण्यात शुक्रवारी आंदोलन केलं. मुंबईत शिवाजी पार्कवर तर पुण्यात उच्च माध्यमिक बोर्डाच्या ऑफिससमोर (MSBSHSE) विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. मुंबईतील आंदोलनात ठाणे, नवी मुंबईतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. परीक्षा ऑनलाइन घ्यावात अशी प्रमुख मागणी आंदोलक विद्यार्थ्यांची आहे.

विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत?

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परिक्षा ऑनलाईन घ्या

वर्षभर प्रॅक्टिक्ल झाले नाहीत, लेक्चर ऑनलाईन झाले. त्यामुळे आमची शालेय फी 70-30 करत परत करावी

सध्याच्या वेळापत्रकात दोन विषयांच्या पेपरमधील अंतर फारच कमी असल्याने ते वाढवावं

आम्हाला ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय काही समजलेच नाही. तर त्याची परीक्षा कशी देणार?

परीक्षा ऑफलाईन घेत असाल तर विद्यार्थ्यांची जबाबदारी शिक्षणमंत्र्यानी स्वीकारावी

मार्च महिन्यात जवळजवळ दहा हजारांहून अधिक लहान मुलांना कोरोना झाला आहे .या गोष्टीचा विचार करून विद्यार्थ्यांच्या आरोग्यासोबत खेळू नये.

अशा विविध मागण्यांसह विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. शिक्षणमंत्र्यांनी या मागण्यांचा लवकरात लवकर विचार करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.

3 एप्रिलपासून www.mahahsscboard.in या मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवरून कॉलेजच्या लॉगइनद्वारे हॉलतिकीट डाऊनलोड करुन मिळणार आहे.

Pune Lockdown Breaking News: पुण्यात PMP सह हॉटेल, मॉल 2 आठवड्यांसाठी बंद; शहरात नवी नियमावली जाहीर

महाविद्यालयांनी बारावीची ऑनलाइन प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांना प्रिंट करून द्यायची आहेत. यासाठी कोणतेही वेगळे शुल्क विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येऊ नये अशा सूचनाही मंडळाने दिल्या आहेत.

First published:

Tags: Exam, Student