Home /News /pune /

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 'बर्निंग ट्रेलर'चा थरार, LIVE VIDEO

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 'बर्निंग ट्रेलर'चा थरार, LIVE VIDEO

मुख्य महामार्गावरच या ट्रेलरने पेट घेतल्यामुळे एकच धावपळ उडाली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

    आनिस शेख, प्रतिनिधी पुणे, 17 जानेवारी : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (mumbai-pune expressway) आज पहाटे बर्निंग ट्रेलरचा थरार पाहण्यास मिळाला. मुख्य महामार्गावरच या ट्रेलरने पेट घेतल्यामुळे एकच धावपळ उडाली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुंबईहून हा ट्रेलर पुण्याच्या दिशेने जात होता. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर किलोमीटर 46 बोरघाटात आला असता ट्रेलरच्या  केबिनने अचानक पेट घेतला. बघता बघता आगीने रौद्ररुपधारण केले आणि संपूर्ण ट्रेलर आगीच्या भक्षस्थानी सापडला. वाहनचालकाला आगीची घटना कळताच त्याने ट्रेलर महामार्गावर सुरक्षित ठिकाणी  लाउन पेटलेल्या वाहनातून आपला जीव वाचवला. त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. WhatsApp Web ही सेफ नाही? गुगल सर्चवर युजर्सचे पर्सनल मोबाईल नंबर लीक अपघातानंतर आयआरबी पेट्रोलिंग, महामार्ग वाहतूक पोलीस, डेल्टा फोर्स आणि देवदूत यंत्रणेने या घटनेत तातडीने उपाय केल्याने जीवितहानी टळली.  त्यामुळे इतर वाहनांना होणारा धोका ही टळला आहे. महामार्गाच्या मध्यभागी ट्रेलर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला होता. त्यामुळे काही काळ वाहतूक ही विस्कळीत झाली होती. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर करण्यात आली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या