मराठी बातम्या /बातम्या /पुणे /मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मारुती सुझुकीची कार रेलिंग तोडून उलटली, भीषण अपघाताचा VIDEO

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मारुती सुझुकीची कार रेलिंग तोडून उलटली, भीषण अपघाताचा VIDEO

भरधाव वेगात असताना अचानक कारवरील नियंत्रण सुटले आणि कार  एक्स्प्रेस वेवर सुरक्षेकरिता  लावण्यात आलेल्या लोखंडी रेलिंग तोडून उलटली.

भरधाव वेगात असताना अचानक कारवरील नियंत्रण सुटले आणि कार एक्स्प्रेस वेवर सुरक्षेकरिता लावण्यात आलेल्या लोखंडी रेलिंग तोडून उलटली.

भरधाव वेगात असताना अचानक कारवरील नियंत्रण सुटले आणि कार एक्स्प्रेस वेवर सुरक्षेकरिता लावण्यात आलेल्या लोखंडी रेलिंग तोडून उलटली.

आनिस शेख, प्रतिनिधी

पुणे, 13 जुलै : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव चारचाकी कारला भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील तिघे जण गंभीर तर 1 जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला.

या अपघातात  सुदीप घोश, शुभम फुंडे ,अनुराग मिश्रा, हे तिघे गंभीर जखमी झाले असून प्रसाद पाटील  किरकोळ जखमी झाला आहे. हे सर्वजण उल्हासनगर मुंबई येथून मारुती सुझुकी सियाझ या कारने पुण्याकडे जात होते. एक्स्प्रेस वेवरील  गहुंजे स्टेडियमजवळ हा अपघात झाला.

हा अपघात इतका भीषण होता की, यात कारचा पार चुराडा झाला. भरधाव वेगात असताना अचानक कारवरील नियंत्रण सुटले आणि कार  एक्स्प्रेस वेवर सुरक्षेकरिता  लावण्यात आलेल्या लोखंडी रेलिंग तोडून उलटली. या कारचा वेग इतका होता की, महामार्गावर लावण्यात आलेल्या रेलिंग अक्षरश: तोडून दूर फेकले गेले.

बैलगाडीतून शालेय पुस्तक नेण्याची या शिक्षकावर का आली वेळ? काय आहे प्रकरण

या अपघातातील जखमींना एक्स्प्रेसवेवरील ट्रामा सेंटर येथे हलविण्यात आले आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील भरधाव वाहनांवर महामार्ग पोलिसांकडून दररोज स्पीडगन च्या माध्यमातून कारवाई करण्यात येते. परंतु, तरी देखील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत आहे. काही चालक आपला जीव धोक्यात टाकून  महामार्गावर अपघाताला कारणीभूत ठरत आहे. स्वतःचा तसंच इतरांच्या जीव धोक्यात घालताना पाहायला मिळत आहे.

First published:
top videos