मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

Pune : ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच Kiran Gosavi च्या विरोधात पुण्यात आणखी एक गुन्हा दाखल, वाचा काय आहे आरोप

Pune : ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच Kiran Gosavi च्या विरोधात पुण्यात आणखी एक गुन्हा दाखल, वाचा काय आहे आरोप

One more FIR against Kiran Gosavi in Pune : क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणातील एनसीबीचा पंच किरण गोसावी याच्या विरोधात पुण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.

One more FIR against Kiran Gosavi in Pune : क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणातील एनसीबीचा पंच किरण गोसावी याच्या विरोधात पुण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.

One more FIR against Kiran Gosavi in Pune : क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणातील एनसीबीचा पंच किरण गोसावी याच्या विरोधात पुण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.

पुणे, 30 ऑक्टोबर : मुंबईतील क्रूझवरील ड्रग्ज पार्टी (Mumbai Cruise drug party case) प्रकरणात एनसीबीचा पंच असलेला किरण गोसावी (NCB witness Kiran Gosavi) याच्या अडचणीत आता आणखी वाढ होताना दिसत आहे. फसवणुकीच्या आरोपाखाली अटकेत असलेला किरण गोसावी याचा पाय आता आणखी खोलात जाताना दिसत आहे. पुण्यात किरण गोसावी याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील (Pune) लष्कर पोलिसांत हा गुन्हा दाखल झाला आहे. (One more FIR registered against Kiran Gosavi in Pune)

पुणे पोलिसांनी सांगितले की, किरण गोसावी याने नोकरी लावण्याच्या नावाखाली अनेकांना गंडा घातला आहे. तीन तक्रारदारांच्या तक्रारी नंतर लष्कर पोलिसांत किरण गोसावीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम 420, 465 आणि 468 अंतर्गत किरण गोसावीच्या विरोधात गुन्हा धाकल करण्यात आला आहे. यापूर्वीच फसवणुकीच्या आरोपाखाली किरण गोसावीला पुणे पोलिसांनी अटक केली असून 5 नोव्हेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

किरण गोसावीच्या विरोधात तक्रार दाखल करणाऱ्या पीडितांकडून एकूण 4 लाख रुपये घेतले होते. मलेशियात नोकरी लावण्याच्या नावाखाली या तिघांकडून किरण गोसावीने पैसे घेतले होते. या तिघांना नोकरी तर दिलीच नाही आणि पैसेही देण्यास नकार दिला.

वाचा : किरण गोसावीचा अटक होण्यापूर्वीचा VIDEO आला समोर

मुंबईत क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीने किरण गोसावी याला पंच बनवलं होतं. या प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला सुद्धा अटक करण्यात आली आहे. आर्यन खानसोबत किरण गोसावीने फोटो काढला होता आणि तो फोटो व्हायरल झाल्यानंतरच किरण गोसावी अडचणीत आला. त्यानंतर त्याच्या वरिोधात दाखल असलेल्या तक्रारींची माहिती समोर आली.

पुणे पोलिसांनी लॉजमधून केली अटक

मुंबईतील क्रूझ पार्टी प्रकरणात एनसीबीचा पंच किरण गोसावी याला पुणे पोलिसांनी 28 ऑक्टोबर रोजी अटक केली आहे. किरण गोसावी याच्यावर फसवणुकीचे विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पुणे पोलिसांनी किरण गोसावी याला पहाटे एका लॉजमधून अटक केली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा केला आहे.

पुणे पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पहाटेच्या सुमारास कात्रजमधील एका लॉजमधून किरण गोसावी याला अटक करण्यात आली आहे. त्याने आत्मसमर्पण केले नसून अटक करण्यात आली आहे. नोकरीचं आमिष दाखवत त्याने अनेकांची फसवणूक केली आहे. गोसावीला कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्याने आणकी काही नागरिकांची फसवणूक केली असल्याची माहिती समोर येत आहे.

बऱ्याच ठिकाणी गेल्या 10 दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी तो फिरत होता. यामध्ये लखनऊ, फतेहपूर, तेलंगणा, जबलपूर, जळगाव, मुंबई, पनवेल, लोणावळा या ठिकाणांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी पुणे पोलिसांच्या टीम गेल्या होत्या. हा पळत होता तेव्हा तो सचिन पाटील या नावाने सर्वत्र जात होता. सचिन पाटील या नावाने हॉटेलमध्ये राहत होता. आपण स्टॉप क्राईम एन्जीओचा प्रतिनिधी असल्याचंही तो सांगतो. ही प्राथमिक माहिती मिळाली आहे आम्ही याची खातरजमा आणि चौकशी करत आहोत असंही पोलिसांनी सांगितलं.

First published:

Tags: Aryan khan, Crime, Drug case, NCB, Pune