मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

म्युकरमायकोसिसने वाढवली पुणेकरांची चिंता; राज्यातील सर्वाधिक रुग्ण पुण्यात

म्युकरमायकोसिसने वाढवली पुणेकरांची चिंता; राज्यातील सर्वाधिक रुग्ण पुण्यात

Mucormycosis in Pune: पुण्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची सर्वाधिक संख्या असल्याची माहिती समोर आली आहे.

Mucormycosis in Pune: पुण्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची सर्वाधिक संख्या असल्याची माहिती समोर आली आहे.

Mucormycosis in Pune: पुण्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची सर्वाधिक संख्या असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई, 21 मे: राज्यात कोरोनाचे (Coronavirus) सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यात होते. पुण्यातील कोरोनाची रुग्ण संख्या कमी होत असतानाच आता पुन्हा पुणेकरांची चिंता वाढली आहे. कारण, म्युकरमायकोसिस (Mucormycosis) आजाराचे सर्वाधिक रुग्ण हे पुण्यात (Mucormycosis highest patients in Pune) असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्याच्या पाठोपाठ म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण हे नागपूर जिल्ह्यात आहेत.

कुठल्या जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे किती रुग्ण

राज्यात म्युकरमायकोसिसचे 1 हजार सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी सर्वाधिक रुग्ण हे पुण्यात आहेत. पुण्यात म्युकरमायकोसिसचे 273 रुग्ण आहेत. त्यानंततर नागपुरमध्ये 148 रुग्ण आहेत. औरंगाबादमध्ये 67 रुग्ण आहेत. नांदेडमध्ये 60, चंद्रपुरात 48, लातूर 28 तर ठाण्यात 22 रुग्ण आहेत.

राज्यातील म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचारासाटी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, या रुग्णांच्या उपचारासाठी लागणारे एम्पोटेरेसिन इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. काही जिल्ह्यांत तर इंजेक्शनच उपलब्ध नाहीयेत.

खळबळजनक! कोरोनापाठोपाठ Mucormycosis सुद्धा लहान मुलांपर्यंत पोहोचला; पालकांनो अलर्ट राहा

या जिल्ह्यांत म्युकरमायकोसिसचा एकही रुग्ण नाही

राज्यासाठी दिलासादायक बातमी म्हणजे काही जिल्ह्यांत म्युकरमायकोसिसचा एकही रुग्ण वाहीये. यामध्ये गडचिरोली, गोंदिया, बुलढाणा, सिंधुदुर्ग, सातारा, रायगड, पालघर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

म्युकरमायकोसिस रुग्मांवर मोफत उपचार

राज्यात म्युकरमायकोसीस या आजाराची तीव्रता वाढत असून त्यासाठी बहुआयामी विशेषज्ञ सेवांची गरज भासत आहे. त्यासाठी लागणार खर्च जास्त असून सामान्य रुग्णांवर त्याचा भार पडून नये यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र नागरिकांवर अंगीकृत रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसीस आजारावर उपचार करण्यात येणार असल्याचं काही दिवसांपूर्वीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

First published:

Tags: Coronavirus, Nagpur, Pune