मराठी बातम्या /बातम्या /पुणे /MPSC आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी भाजपनंतर आता खासदार श्रीकांत शिंदे यांचीही घेतली भेट

MPSC आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी भाजपनंतर आता खासदार श्रीकांत शिंदे यांचीही घेतली भेट

सरकारमध्येच श्रेयवादाची लढाई?

सरकारमध्येच श्रेयवादाची लढाई?

MPSC Protest : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा परीक्षेच्या मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक पद्धत लागू करण्याच्या निर्णयाला विद्यार्थ्यांचा विरोध होता. विद्यार्थ्यांनी राज्यभर आंदोलन केलं होतं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

ठाणे, 31 जानेवारी : पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं परीक्षांच्या मुख्य परीक्षांसाठी वर्णात्मक पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला होता. यूपीएससीच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, विद्यार्थ्यांनी आंदोलन करत हा पॅटर्न 2025 पासून लागू करण्याची मागणी केली होती. आज राज्य सरकारनं ही मागणी अखेर मान्य केली आहे. मात्र, आता यावरुन श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. एकीकडे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, अभिमन्यू पवार आणि रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत आंदोलनस्थळी उपस्थित होते. यानंतर आता शिंदे गटाची युवासेना देखील सक्रीय झाली आहे.

आता शिंदे गटाही सक्रीय

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॅा. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना भेटायला त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी आले आहेत. जवळपास 30-40 विद्यार्थी आले असून फुलांचा बुके आणि पेढे घेवून विद्यार्थी आले आहेत. निर्णयाचं सगळं श्रेय भाजप नेते देवेंद्र फडणवीस, आमदार गोपिचंद पडळकर, आमदार अभिमन्यू पवार घेत असल्याचं दिसत होतं. त्यामुळे आता शिंदे गटाचे कार्यकर्तेही सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे.

वाचा - नोकरी सोबतच UPSC ची तयारी, पठ्ठ्यानं करुन दाखवलं! IAS च बनला

विद्यार्थ्यांकडून आंदोलनाचं क्षेय आपल्याच सहकाऱ्याला..

एमपीएससी आंदोलनाच्या श्रेयवादाची लढाई आता सोशल मीडियावरही पाहायला मिळत आहे. पहिले आंदोलन करणाऱ्या बळीराम डोळे या युवकाला याचं श्रेय दिलं आहे. बळीराम डोळे या विद्यार्थ्याने यासाठी पहिल्यांदा आंदोलनाचं हत्यार उपसलं होतं.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आवाज राज्य सरकारनं ऐकला : पडळकर

विद्यार्थ्यांनी जो लढा उभारला होता त्याला यश आलं आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आवाज राज्य सरकारनं ऐकला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे अत्यंत संवेदनशील आहेत. महाराष्ट्रात कुठलाही कसलाही प्रश्न निर्माण झाल्यास तो सोडवण्याची क्षमता असलेलं नेतृत्त्व सत्तेत आहे, असं गोपीचंद पडळकर म्हणाले. आजच्या यशाचं श्रेय विद्यार्थ्यांना जात आणि सरकार विद्यार्थ्यांच्या पाठिशी ठाम आहे. विद्यार्थ्यांचं श्रेय आहे हे सरकारचं श्रेय आहे, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

First published:

Tags: MPSC Examination, Student