Home /News /pune /

‘मी हायवेवरून शेताची पाहणी करत दौरा केला नाही’, खासदार संभाजीराजेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

‘मी हायवेवरून शेताची पाहणी करत दौरा केला नाही’, खासदार संभाजीराजेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

'शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची एकरकमी मदत द्या अशी शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे. 99 टक्के शेतकऱ्यांना अँड्रॉइड म्हणजे काय माहीत नाही त्यामुळे ऑनलाईनच्या जास्त मागे लागू नये.'

पुणे 21 ऑक्टोबर: राज्यात चार दिवस ओल्या दुष्काळाची पाहणी केल्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी बुधवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. राज्य आणि केंद्र सरकारने ऐकमेकांकडे बोटं दाखवू नयेत तर शेतकऱ्यांना मदत करावी, शेतकऱ्यांना सरकारने हेक्टरी 50 हजारांची मदत करावी अशी मागणी केली. संभाजीराजे म्हणाले, मी चिखलातून, ट्रॅक्टरमधून, बैलगाडीमधून दौरा केला, माझे दौरे हे ग्राऊंडवर आहेत, हाय वे वर पाहणी करून मी निघून गेलो नाही, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता लगावला. ते पुढे म्हणाले, अतिवृष्टीमुळे अपरिमित नुकसान झालं आहे. इतर कामे बाजूला ठेवून युद्ध पातळीवर काम केलं पाहिजे. ओला दुष्काळ जाहीर करा. वाहून गेलेल्या सोयाबीनचे पैसे मिळणार नाहीत हा नियम बदलला पाहिजे. शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची एकरकमी मदत द्या अशी शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे. 99 टक्के शेतकऱ्यांना अँड्रॉइड म्हणजे काय माहीत नाही त्यामुळे ऑनलाईनच्या जास्त मागे लागू नये. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे महाभयानक परिस्थिती आहे. मी खासदार म्हणून नव्हे तर छत्रपती घराण्याचा सदस्य म्हणून 4 दिवसांच्या दौऱ्यावर गेलो होतो. शेतकरी जगावा यासाठी त्याला नैतिक आधार देण्यासाठी मी गेलो. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला मदत मिळावी यासाठी मी तिकडे गेलो होतो. मंदिराच्या बाहेरूनच उद्धव ठाकरे यांनी घेतलं आई तुळजाभवानीचं दर्शन VIDEO जे छत्रपती शिवाजी राजे म्हणाले होते तेच मला म्हणायचे आहे. आपला पोशिंदा शेतकरी जगला पाहिजे, माझं तुझं करू नका. मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. त्यानंतर केंद्राकडून मदत मिळू शकते. केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी प्रस्ताव तयार करुन द्यायला पाहिजे, सरकारने प्रशासनाला आदेश देऊन ओला दुष्काळ जाहीर करावा. आताच मदत जाहीर केली नाही तर शेतकऱ्यांना रब्बीची तयारी करता येणार नाही. सरकारने विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची कॉलर पकडावी, त्यांनी जाचक अटी लादल्यात, असं असेल तर मदत कशी मिळणार असा सवाल त्यांनी केला. कांदा घेणे परवडत नसेल तर लसूण-मुळा खा, बच्चू कडूंचा हटके सल्ला, VIDEO माझ्यावर जबाबदारी दिली तर मी दिल्लीत पाठवपूरावा करण्यास तयार आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामेच होत नाहीत अशा तक्रारी आहेत. राज्य आणि केंद्राने एकमेकांकडे बोट दाखवू नये असंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री काय म्हणाले? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारीही पावसामुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा करत आढावा घेतला. नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, नुकसान मोठं आहे, लवकरात लवकर मदत देऊ, सर्व नुकसानीला मदत देऊ. विरोधकांच्या टीकेकडे लक्ष द्यायला वेळ नाही. जे करायचे ते ठोस करायचे हा माझा स्वभाव आहे असं म्हणत त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. सगळी सोंग आणता येतात मात्र पैशांचं सोंग आणता येत नाही. केंद्राने जीएसटीचे पैसै दिले असते तर लगेच मदत करता आली असती असं मुख्यमंत्र्यांनी तुळजापूर इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Uddhav thackarey

पुढील बातम्या