आई म्हणजे आईच असते! पोटच्या तीन लेकरांसाठी 'ती' कोविड सेंटरमध्ये

आई म्हणजे आईच असते! पोटच्या तीन लेकरांसाठी 'ती' कोविड सेंटरमध्ये

स्वत:पेक्षाही जी आधी मुलांचा विचार करते त्या आईची माया कोरोना काय कोणीच रोखू शकणार नाही.

  • Share this:

पुणे, 18 एप्रिल : आपल्या चुकांवर पांघरून घालणारी, आपल्याला उभं राहण्यासाठी बळ देणाऱ्या आईची तुलना कोणासोबतही होऊ शकत नाही. कोरोनाच्या या संकटाने अनेक नात्यांतील खोटेपणा समोर आणला. मात्र आईचं मुलांप्रतीचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही आणि ते कधीच होऊ शकणार नाही. अशीच एक घटना समोर आली आहे.

पुण्यातून गावाकडे परतलेल्या एका कुटुंबाला कोरोनाचा विळखा बसला. या कुटुंबातील तीन मुलांसह वडिलांना कोरोनाची लागण झाली. यात सुदैवाने आईचा कोविड रिपोर्ट निगेटिव्ह निघाला. तीन मुलांपैकी एक तर 7 महिन्यांचा होता. त्या चारही जणांना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्याची तयारी सुरू झाली. आईचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी ती आपल्या लेकरांसाठी कोविड सेंटरमध्ये दाखल झाली.

हे ही वाचा-अन् वरुण धवननं त्या लहान मुलीला गंडवलं; Video पाहून हसून हसून व्हाल वेडे

सध्या हे कुटुंब शहरातील ईदगाह कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. निलंगा तालुक्यातील एका गावात राहणारं हे कुटुंब पुण्यात कामासाठी वास्तव्यास आहेत. पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या कुटुंबाने आपल्या गावी उमरग्यात जाण्याचा निर्णय घेतला. येथे परतल्यानंतर पतीला अस्वस्थ वाटू लागलं. त्यांची चाचणी केल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. सात महिन्याचे बाळ, दोन मुलींसाठी आई कोविड सेंटर येथे राहून गरजेनुसार सुरक्षितता बाळगून बाळासोबत आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: April 18, 2021, 6:57 PM IST

ताज्या बातम्या