Home /News /pune /

आई तू असं कसं करू शकतेस! 4 वर्षाच्या लेकीला जमिनीवर आपटलं आणि चार्जरच्या वायरने....

आई तू असं कसं करू शकतेस! 4 वर्षाच्या लेकीला जमिनीवर आपटलं आणि चार्जरच्या वायरने....

जन्मदात्या आईनेच आपल्या चार वर्षीय मुलीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये संताप पसरला आहे.

पिंपरी-चिंचवड, 27 जुलै : आपल्याला सगळ्यांपेक्षा जास्त जीव लावणारी आपली आई असते. पण याच नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. मुलगी त्रास देत असल्याच्या रागातून जन्मदात्या आईनेच आपल्या चार वर्षीय मुलीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. ही घटना सांगवी परिसरातील असून या प्रकरणी आरोपी आईला सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे. घटनेत रिया काकडे असं मृत्यू झालेल्या चिमुकलीचं नाव आहे. या चार वर्षीय मुलीचा या घटनेत मृत्यू झाला आहे. सांगवितील भालेकर नगरमध्ये सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. चाकणमध्ये रात्री घडला हत्येचा थरार, 36 वर्षीय युवकाचा कोयत्याने वार करून खून सविता काकडे असं आरोपी आईचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार वर्षीय रियाचा आईने खून केल्याची घटना पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवीत घडली आहे. या प्रकरणी आई ला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. घरात सासू, सासरे, दोन मुलं, पती हे सर्व जण राहात असतात. पलंगावरून पडला कोरोना रुग्ण, पण हॉस्पिटलच्या दुर्लक्षामुळे घडला भयंकर प्रकार
मात्र, सासू च्या मृत्यू झाल्याने त्यांचा दश क्रिया विधी असल्याने आज सर्व जण बाहेरगावी गेले होते. घरात सहा महिन्यांचा चिमुकला, चार वर्षांची रिया हेच होते. तेव्हा, आज सकाळी रिया त्रास देत असल्याने आई रागवालेल्या सविताने आधी फरशीवर आदळले नंतर चार्जरच्या वायर ने तिचा गळा आवळून खून केला. पतीच्या मृत्यूनंतर 8 दिवसात पत्नीचा मृत्यू, मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार कोण? दरम्यान, आरोपी सविता यांचे मानसिक संतुलन ठीक नसल्याचे ही सांगण्यात येत आहे. सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
Published by:Renuka Dhaybar
First published:

Tags: Pune, Pune news

पुढील बातम्या