अखेर मुलीची भेट झाली नाही; शुभेच्छा देण्यासाठी जाणाऱ्या दांपत्याचा अपघात, आईचा मृत्यू

अखेर मुलीची भेट झाली नाही; शुभेच्छा देण्यासाठी जाणाऱ्या दांपत्याचा अपघात, आईचा मृत्यू

मुलीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलेल्या आई-वडिलांच्या गाडीला अपघात झाला आहे. अपघात इतका भीषण होता की यात मुलीची आई जागीच ठार तर वडील गंभीर जखमी झाले आहेत.

  • Share this:

पुणे, 27 फेब्रुवारी : पुण्यात अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलेल्या आई-वडिलांच्या गाडीला अपघात झाला आहे. अपघात इतका भीषण होता की यात मुलीची आई जागीच ठार तर वडील गंभीर जखमी झाले आहेत.

धारूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिलकुमार जाधव हे पत्नी सुजाता (४०) यांच्यासह जात असताना नगर-पुणे महामार्गावर पहाटेच्या सुमारास त्यांच्या कारला अपघात झाला. यामध्ये त्यांच्या पत्नी जागीच ठार झाल्या असून जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत.

अनिलकुमार जाधव हे सध्या धारूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावतात. त्यांची ऐश्वर्या नावाची मुलगी पुण्यात युपीएससीची तयारी करीत आहे. तसंच ती एका शाळेमध्ये शिक्षिकाही आहे. ऐश्वर्याचा आज वाढदिवस होता. तिला शुभेच्छा देण्यासाठी जाधव हे पत्नी सुजाता यांच्यासह कारने (एमएच १० - ८८८९) पुण्याला जात होते.

नगर-पुणे महामार्गावर बेलखंडी पोलीस ठाणे हद्दीत गव्हाणवाडी जवळ त्यांच्या कारला अपघात झाला. उभा असलेल्या कंटेनरला कार धडकून रस्त्याच्या खाली गेल्याने हा अपघात झाल्याचे शिरूर पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. जाधव हे स्व:त कार चालवत होते तर पत्नी या बाजूला बसल्या होत्या. कार डाव्या बाजुला पलटल्याने त्यामध्ये अडकल्या.

हा अपघात झाल्याची माहिती समजताच बाजूच्या लोकांनी धाव घेत दोघांनाही जवळच्या रूग्णालयात दाखल केलं. पण त्याच वेळी सुजाता यांचा मृत्यू झाला आहे.

VIDEO: दिल्ली विमानतळावर सैनिकांचं आगमन होताच नागरिकांनी दिली 'अशी' सलामी

First published: February 27, 2019, 8:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading