• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • लाचखोर उपायुक्त नितीन ढगेच्या घरात कोट्यवधी रुपयांचं घबाड, सापडली तब्बल एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रोकड

लाचखोर उपायुक्त नितीन ढगेच्या घरात कोट्यवधी रुपयांचं घबाड, सापडली तब्बल एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रोकड

जात पडताळणी (Caste Verification) उपायुक्तांकडे (Deputy Commissioner) कोट्यवधी रुपयांचे घबाड सापडल्याचं समजतंय.

 • Share this:
  पुणे, 18 ऑक्टोबर: एक मोठी बातमी समोर आली आहे. जात पडताळणी (Caste Verification) उपायुक्तांकडे (Deputy Commissioner) कोट्यवधी रुपयांचे घबाड सापडल्याचं समजतंय. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्यानंतर उपायुक्ताच्या घरी सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. यामध्ये तब्बल एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रोकड मिळाली आहे. तर सुमारे दीड कोटी रुपयांच्या मालमत्तांचे कागदपत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागलेत. नितीन चंद्रकांत ढगे असं उपायुक्ताचं नाव असून 8 लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. दोन लाख रुपये घेताना करण्यात अटक करण्यात आली होती. अटक केल्यानंतर उपायुक्ताच्या घराची झडती घेण्यात आली. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केलेल्या कारवाई त्याच्या घरातून एक कोटी रुपयांपेक्षा जास्तची रोकड मिळाली आहे. हेही वाचा- T20 World Cup: गेल्या 11 वर्षांपासून विराटला आहे 'या' रेकॉर्डची प्रतीक्षा, यंदा स्वप्न पूर्ण होणार? काय आहे नेमकं प्रकरण पुण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य आणि उपायुक्त नितीन चंद्रकांत ढगे यांना 1 लाख 90 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. एसीबीनं अचानक केलेल्या या कारवाईमुळे चांगलीच खळबळ उडाली. नितीन चंद्रकांत ढगे (वय 40) असे पकडण्यात आलेल्या उपायुक्ताचे नाव आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, नितीन ढगे हे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात उपायुक्त आहेत. तसंच ते जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सुद्धा आहेत. हेही वाचा- नाशिक जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्ण संख्येत वाढ, गेल्या 2 दिवसात 270 कोरोना रुग्णांची नोंद तक्रारदाराने त्याच्या पत्नीचे जात प्रमाणपत्र पडताळणी करून ते वैध करण्यासाठी जिल्हा जात पडताळणी कार्यालयात अर्ज केला होता. त्यावेळी नितीन ढगे यांनी तक्रारदाराकडे 8 लाख रुपयांची लाच मागितली होती, अशी माहिती समोर आली आहे. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनंतर एसीबीनं सापळा रचला. त्यानंतर नितीन ढगे यांना 1 लाख 90 हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडलं. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ढगे सध्या एसबीच्या ताब्यात आहे. त्यांची चौकशी सुरु आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published: