Home /News /pune /

पुण्यातून चिंताजनक बातमी, नव्या आकडेवारीमुळे प्रश्नचिन्ह

पुण्यातून चिंताजनक बातमी, नव्या आकडेवारीमुळे प्रश्नचिन्ह

पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 88861वर पोहोचली आहे.

पुणे, 02 ऑगस्ट : महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता लाखाकडे वाटचाल करत आहे. पुण्यात रात्रभरातून तब्बल 277 रुग्णांची वाढ झाली आहे.  पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही तब्बल 88861वर पोहोचली आहे. धक्कादायक म्हणजे, पुण्यात आला मृतांची आकडेवारी वाढली आहे. मृतांचा आकडा दोन हजार पार झाला आहे.  जिल्ह्यात कोरोनामुळे 2035 जणांचा मृत्यू झाला आहे. ..तर लोकं रस्त्यावर उतरून पंतप्रधानांचा राजीनामा मागतील, राऊतांचा मोदींवर निशाणा तर महाराष्ट्रात शनिवारी तब्बल 10 हजार कोरोना रुग्णांना 24 तासांमध्ये डिस्चार्ज देण्यात आला. तर नव्याने 9,601 रुग्ण सापडले आहे. तर रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढली असून शनिवारी 322 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आत्तापर्यंतच्या मृत्यूची संख्या ही 15,316वर गेली असून एकूण रुग्ण 4,31,719 एवढे झाले आहेत. राज्यात 1,49,214 रुग्ण आहेत त्यातले 46,345 रुग्ण हे पुण्यात आहेत. मुंबईत 1,059 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 45 जणांचा मृत्यू झाला. शहरात 20,749 सक्रिय रुग्ण आहेत. तर मृत्यूचा आकडा 6,395 वर पोहोचला आहे. देशात 50 ते 55 हजार नवीन लोकांना कोरोनाचा संसर्ग दरम्यान, देशात कोरोना संक्रमणाचा वेग वाढत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये जवळपास 50 ते 55 हजार नवीन लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 54 हजार 736 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाग्रस्ताचा आकडा 17 लाख 50 हजार 724 वर पोहोचला आहे. भरधाव BMW कारनं तीन जणांना फरफटत नेलं, अंगावर शहारे आणणारा थरारक VIDEO गेल्या 24 तासांत 853 जणांचा मृत्यू झाला असून देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 37,364 वर पोहोचला आहे. देशात 5 लाख 67 हजार 730 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 11 लाख 45 हजार 630 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात दिली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या