जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Monsoon Update : शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी; पावसाबाबत हवामान खात्याकडून सुधारित अंदाज

Monsoon Update : शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी; पावसाबाबत हवामान खात्याकडून सुधारित अंदाज

मान्सून अपडेट

मान्सून अपडेट

यंदा राज्यात मान्सूनचं आगमन उशिरानं झालं. त्यामुळे पेरण्यांना उशीर झाला आहे. त्यातच आता हवामान विभागानं वर्तवलेल्या नव्या अंदाजानुसार शेतकऱ्यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.

  • -MIN READ Pune,Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 9 जुलै : यंदा राज्यात मान्सूनचं आगमन उशिरानं झालं. मान्सून तळ कोकणात दाखल झाल्यानंतर आलेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचा मोठा फटका हा मान्सूनला बसला. मान्सूनची गती मंदावली. त्यानंतर बिरपजॉय चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर मान्सूननं महाराष्ट्र व्यापला. यंदा पाऊस उशिरा पडल्यानं पेरणीला देखील उशीर झाला आहे. मात्र यातच आता आणखी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे, ती म्हणजे आतापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा सुमारे 27 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या मोसमी पावसावर एल निनोचं सावट आहे. प्रशांत महासागरात एल निनोची स्थिती निर्माण झाली आहे. एल निनो स्थितीमुळे मोसमी पाऊस कमी पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. मात्र दीर्घकालीन अंदाजानुसार सरासरी इतक्याच पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Agriculture News : फक्त एका झाडापासून मिळणार 25 हजारांपर्यंत उत्पन्न, असं कोणतं आहे हे फळ?

पेरण्याला उशीर  दरम्यान यंदा राज्यात मान्सूनचं आगमन उशिरानं झाल्यानं पेरण्या देखील लांबल्या. सामान्यपणे जूनमध्ये पेरणीची कामे पूर्ण होतात. मात्र यंदा बहुतांश पेरण्या या जुलैमध्ये झाल्या आहेत. त्यातच आता हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार जर पावसाने ओढ दिली तर शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात