मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

Monsoon Update: संपूर्ण देशाला मान्सूननं व्यापलं; आज पुण्यासह या जिल्ह्यांना रेड अलर्ट

Monsoon Update: संपूर्ण देशाला मान्सूननं व्यापलं; आज पुण्यासह या जिल्ह्यांना रेड अलर्ट

Weather Update: पुढील पाच दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Weather Update: पुढील पाच दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Weather Update: पुढील पाच दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 13 जुलै: जून महिन्याच्या सुरुवातीला नैऋत्य मोसमी (Southwest) वाऱ्यांनी केरळात दिमाखात आगमन केलं होतं. त्यानं अवघ्या काही दिवसांतच मान्सूननं (Monsoon) कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र राज्याला व्यापत उत्तरेत प्रवास केला होता. पण काही दिवस जोरदार पाऊस झाल्यानंतर उत्तरेत मान्सून मंदावला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी तापमानात देखील वाढ झाली होती. जवळपास 20 दिवसांचा ब्रेक घेतल्यानंतर देशात पुन्हा मान्सून वापसी (Monsoon Comeback) झाली आहे. यानंतर आता मान्सून दिल्लीसह संपूर्ण देशाला व्यापल्याची (Monsoon covers entire country) अधिकृत माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

कोकणात मुसळधार पाऊस

मागील आठ दिवसांपासून कोकणातील बहुतांशी जिल्ह्यांना मान्सूनच्या पावसानं झोडपून काढलं आहे. अनेक ठिकाणी पुरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला होता. आजही कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांसह पालघर जिल्ह्यालाही हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी

सलग तीन दिवसांपासून पुणे शहरासाठी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. आज घाट परिसरातील पुण्यासह सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या तिन्ही जिल्ह्यांना हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी वेगवान वाऱ्याच्या साथीनं विजांचा गडगडाट होणार आहे.

हेही वाचा-Maharashtra Unlock: कोरोना निर्बंध हटवण्यासाठी राज्य सरकारचा "ओपनिंग अप" मंत्र

हवामान खात्याच्या सुधारित अंदाजानुसार, पुढील तीन तासांत पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, नंदूरबार आणि बीड या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान 30 ते 40 किमी प्रतितास वेगानं वारा वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. याशिवाय आज सकाळपासून मुंबईतही ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. पुढील काही तासांत मुंबईतही जोरदार पावसाच्या सरी कोसळणार आहेत.

First published:

Tags: India, Maharashtra, Monsoon, Pune, Weather forecast