Weather in Maharashtra: 21 मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटावर मान्सून दाखल होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आहे. पुढील 2 ते 3 दिवसांत मध्य महाराष्ट्रासह घाट भागात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
पुणे, 22 मे: मागील काही दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत कठीण होते. एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना राज्यावर तौत्के चक्रीवादळाचं (Tauktae Cyclone) संकट आलं होतं. या संकटाचा महाराष्ट्रानंसामना केला आहे. पण या चक्रीवादळामुळे मुंबईसह, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर या जिल्ह्यातील नागरिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. तर अनेकांची घरवरील छत उडून गेल्यानं त्यांच्यावर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. तौत्के चक्रीवादळाचे अद्याप पंचनामेही झाले नाहीत, तोपर्यंत राज्यात मान्सूनची (Monsoon) चाहूल लागली आहे.
21 मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटावर मान्सून दाखल होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आहे. शुक्रवारी अंदमान आणि निकोबार बेटावर मान्सूननं हजेरी लावली आहे. आजही अंदमानमध्ये पावसाचे काळे ढग घोंघावत असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आजही याठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील आठ दिवसांत म्हणजेच दरवर्षी प्रमाणे 1 जून रोजी केरळात मान्सूनचं आगमन होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आलं आहे.
तत्पूर्वी पुढील 3 ते 4 दिवसांत मध्य महाराष्ट्रासह घाट भागात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. सोमवारी आणि मंगळवारी पुणे, सातारा, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाला सुरुवात होणार आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. खरंतर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनचं महाराष्ट्रातील हवामानात विविध बदल नोंदले गेले आहे. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे.
हे ही वाचा-ब्लॅक फंगस रोगावरील उपचार खर्च कमी करण्याची मागणी, काय आहे ट्रीटमेंट?केरळात 1 जूनला मान्सून होणार दाखल
हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, 1 जून रोजी केरळात मान्सून दाखल होणार आहे. सध्या मान्सून दाखल होण्यासाठी पोषक हवामान निर्मिती झाली असल्याची माहितीही हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तर 10 जून पर्यंत कोकणातही मान्सूनचं आगमन होईल. त्यानंतर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.