पुण्यात ऑडिशनच्या नावाखाली विनयभंग.. तरुणीला घरी बोलावून केलं असं..

पुण्यात ऑडिशनच्या नावाखाली विनयभंग.. तरुणीला घरी बोलावून केलं असं..

चित्रपट तसेच टीव्ही सीरियलसाठी ऑडिशनच्या नावाखाली पुण्यातील प्रभात रोड तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

पुणे, 25 ऑगस्ट- चित्रपट तसेच टीव्ही सीरियलसाठी ऑडिशनच्या नावाखाली पुण्यातील प्रभात रोड तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी आरोपीली अटक केली आहे. मंदार संजय कुलकर्णी (वय-24, रा. वसंत बहार अपार्टमेंट, प्रभात रोड) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने फोटो शुट करण्यासाठी तरुणीला आपल्या घरी बोलावून तिचा विनयभंग केला. 16 ऑगस्टला ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी आणि पीडित तरुणी आधीपासूनच एकमेकांचे ओळखीचे आहेत. मंदार याने तरुणीला चित्रपट, टीव्ही सीरियलसाठी लागणाऱ्या अभिनयासाठी तरुण-तरुणींची शिफारस करतो, असे सांगितले होते. 'तूही ट्राय कर', असे सांगत मंदारने तरुणीला अ‍ॅडिशनसाठी आपल्या घरी बोलावले. त्याप्रमाणे तरुणी 16 ऑगस्टला सकाळी साडेआठ वाजता मंदारच्या घरी गेली. मंदारने तिला फोटो शुट करायचे आहे, असे सांगून तिली बिकनी परिधान करायला दिली व तिचे पाठीचे फोटो मोबाइल कॅमेऱ्यात घेतले. ते तिला दाखवले. कपड्यांचे माप घेण्यासाठी अंगावरील कपडे काढण्यास सांगितले व मनात लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी पोस्कोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन मंदार कुलकर्णी याला अटक केली आहे.

काय म्हणाले पोलीस....

आपण टीव्ही सीरिसल, चित्रपटासाठी किरकोळ भूमिका करण्यासाठी लोकांचा पुरवठा करतो, असे आरोपी सांगत आहे. त्याने यापूर्वी अनेकांची अशाप्रकारे शिफारस केली आहे. त्यातून यापूर्वी असे अनेक प्रकार घडले असण्याची शक्यता आहे. मात्र, अजून कोणी तक्रार देण्यासाठी पुढे आले नाही. आरोपीची चौकशी सुरू असल्याचे डेक्कन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी सांगितले आहे.

SPECIAL REPORT : पवारांची साथ सोडून उदयनराजे खरंच जातील का भाजपात?

Published by: Sandip Parolekar
First published: August 25, 2019, 10:30 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading