पुणे, 04 ऑगस्ट: जुलै महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला झोडपल्यानंतर राज्यात पावसानं (Rain in maharashtra) उघडीप दिली आहे. सध्या उत्तर भारतात मात्र पावसाचा जोर वाढला आहे. मागील चार-पाच दिवसांपासून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश या राज्यांत अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पश्चिम मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थनातील काही जिल्ह्यांना तर पावसानं झोडपून (Heavy Rainfall) काढलं आहे.
दुसरीकडे, महाराष्ट्रासह दक्षिणात्य राज्यांमध्ये पावसानं पूर्णपणे उघडीप घेतली आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या आहेत. पण उर्वरित दक्षिण भारतात मात्र कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. सध्या पश्चिम बंगाल, बिहार, राज्यस्थान गुजरातचा काही भाग, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.
हेही वाचा-एक वर्षानंतर पहिल्यांदाच वुहानमध्ये आढळला कोरोना रुग्ण; सर्व लोकांची होणार चाचणी
गेल्या दोन आठवड्यापासून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र वगळता राज्यात इतरत्र अपेक्षित पाऊस झाला नाही. उत्तर महाराष्ट्र, मराठवडा, विदर्भात पावसानं पूर्णपणे उघडीप घेतली आहे. पण ढगाळ हवामानमुळे उष्णतेत वाढ झालेली नाही. आज पुण्यासह सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि नाशिक या सात जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर उद्या पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.
राज्यातला हंगामी पाऊस १ जून पासूनचा समाधानकारक दिसत असून धुळे नंदुरबार जळगाव मध्ये सरासरी पेक्षा कमी आहे. गेल्या ७ दिवसातील पावसाची स्थिती पुढच्या नकाशात दिसत असून गेल्या आठवडयात राज्यात पावसाने ओढ दिलेली आहे . IMD ने ऑगस्टच्या पावसाच्या पूर्वानुमानात तसे दर्शवले हि आहे pic.twitter.com/8bWb5F3EC4
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 4, 2021
हेही वाचा-डेल्टानंतर आता RS विषाणूचा हाहाकार; नवजात बालकं विळख्यात, काय आहेत लक्षणं?
यावर्षी जूनपासून राज्यात कोसळलेल्या हंगामी पावसाचा विचार केला असता, राज्यात समाधानकारक पाऊस कोसळला आहे. धुळे, नंदुरबार आणि जळगाव या तीन जिल्ह्यांत मात्र सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. पण गेल्या आठवड्यात पावसानं पुन्हा जोर पडकल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. शिवाय ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Pune, Rain, Todays weather