Home /News /pune /

पुण्यात मनसेचे खळखट्याक! मराठी भाषेच्या मुद्द्यावर Amazonचं ऑफिस फोडलं

पुण्यात मनसेचे खळखट्याक! मराठी भाषेच्या मुद्द्यावर Amazonचं ऑफिस फोडलं

मनसेचे कोंढवा प्रभाग अध्यक्ष अमित आण्णा जगताप यांच्या नेतृत्त्वात हे तिव्र आंदोलन करण्यात आलं. त्यानुसार 'नो मराठी, नो ॲमेझोन' म्हणत कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

पुणे, 25 डिसेंबर: पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आक्रमक झाली आहे. 'मराठी नाही तर ॲमेझोन (Amazon)नाही', असं म्हणतं मनसे कार्यकर्त्यांनी शुक्रवारी कोंढाव्यातील (Kondhawa) ॲमेझॉनचं ऑफिस (Amazon office) फोडलं. महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना आहे. मनसेचे कोंढवा प्रभाग अध्यक्ष अमित आण्णा जगताप यांच्या नेतृत्त्वात हे तिव्र आंदोलन करण्यात आलं. त्यानुसार 'नो मराठी, नो ॲमेझोन' म्हणत कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. हेही वाचा...लातूरच्या शेतकऱ्याचा मराठी बाणा, पंतप्रधान मोदी नमस्ते म्हणाले आणि... मराठी भाषेला आपल्या वेबसाइटवर स्थान द्यावे, अशी मागणी मनसेने ॲमेझोनकडे केली होती. तसं केल्यास मराठी लोकांना सोपे होईल आणि ते वेबसाइटवरून आवश्यक वस्तूंची योग्य निवड करू शकतील, असे मनसेचे म्हणणं आहे. मात्र, ॲमेझोनकडून सकारात्मक उत्तर न मिळाल्याने मनसेने ॲमेझोनविरोधात मोहीम हाती घेतली. मनसे आणि ॲमेझोन यांच्यात सुरु असलेला 'नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन' वाद आता चांगलाच चिघळला आहे. आता हा वाद कोर्टातही गेला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेला ॲमेझोननं कायदेशीर नोटीस बजवली आहे. ॲमेझोन कोर्टात धाव... ॲमेझोननं राज ठाकरे यांच्याविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. दिंडोशी कोर्टानं (Dindoshi Court) या प्रकरणी राज ठाकरेंसह मनसे कामगार सेनेला नोटीस बजावली आहे. 5 जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे त्यांना आदेश देण्यात आले आहेत. काय म्हटलं आहे नोटिशीत... मनसे कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मुंबईतील ॲमेझोन कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात उपस्थित राहण्यास मज्जव करण्यात आला आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुढल्या 5 जानेवारीला त्याची इच्छा असल्यास उपस्थित राहू शकतात, असं दिंडोशी कोर्टानं बजावलेल्या नोटिशीत म्हटलं आहे. ॲमेझोनच्या ॲपवर इतर भाषाप्रमाणे मराठीला सामावून घेण्याचा मनसेचा आग्रह आहे. त्याला ॲमेझोन सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने हा वाद सुरू झाला आहे. मनसेच्या वतीने 'नो मराठी नो ॲमेझोन' ही मोहीम राबवली जात आहे. त्यात आता या नोटीसमुळे वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. ॲमेझोनला सनदशीर मार्गानं आंदोलन केल्याचं समजत नसेल तर आता मनसे आपल्या स्टाईलनं आंदोलन करेल, अशी प्रतिक्रिया मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चौहान यांनी दिली आहे. हेही वाचा...कोरोना निगेटिव्ह आल्यानंतरही रजनीकांत यांची प्रकृती खालावली, रुग्णालयामध्ये भरती नेमका काय आहे वाद? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ड या दोन कंपन्यांना आपापल्या ॲपमध्ये मराठी भाषेचा अंतर्भाव केला नाही तर त्यांचा मनसे स्टाइल समाचार घेण्यात येईल, असा इशारा मनसेनं आधीच दिला होता. ज्याप्रमाणे या कंपन्यांनी दक्षिण भारतातल्या भाषांना प्राधान्य देऊन तिथे त्यांच्या भाषेत ॲप सुरू केले. तसेच महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठीत ॲप आणावे, अन्यथा मनसे आपल्या स्टाईलनं धडा शिकवेल, असा इशारा देण्यात आला होता.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: MNS, Raj raj thackeray, Raj Thackeray

पुढील बातम्या