मुसळधार पावसात वाहून गेली राज ठाकरेंची पहिली प्रचार सभा!

मुसळधार पावसात वाहून गेली राज ठाकरेंची पहिली प्रचार सभा!

सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि आकाशातून कोसळणाऱ्या जलधारांमुळे मैदानात सर्वत्र चिखल झाला होता. जे कार्यकर्ते जमले होते त्यांनी मैदानातल्या खुर्च्या डोक्यावर घेऊन बचाव करावा लागला.

  • Share this:

वैभव सोनावणे, पुणे 09 ऑक्टोंबर : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे बुधवारी (9 ऑक्टोंबर) पुण्यात पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडणार होते. राज यांची ही विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातली पहिलीच सभा असल्याने ते काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र  संध्याकाळी आलेल्या मुसळधार पावसाने राज ठाकरेंची पहिलीच प्रचारसभा होण्याआधीच वाहून गेली. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि आकाशातून कोसळणाऱ्या जलधारांमुळे मैदानात सर्वत्र चिखल झाला होता. जे कार्यकर्ते जमले होते त्यांनी मैदानातल्या खुर्च्या डोक्यावर घेऊन बचाव करावा लागला सभा घेणं शक्यच नसल्याने अखेर वेळेवर सभा रद्द करावी लागली.

मनसेचे एकमेव स्टार प्रचारक मुलुख मैदानी तोफ असलेल्या राज ठाकरेंच्या सभेची सगळ्यांनाच उत्सुकता होती. मोठ्या प्रयत्नानंतर त्यांना सरस्वती मंदिर शाळेचं मैदान मिळालं. या सभेवर परतीच्या पावसाचं सावट होतं. सभा होणार की याची भीती होती अखेर ती भितीच खरी ठरल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. कसबा गणपतीचं दर्शन घेऊन राज ठाकरे भाषण करणार होते.

PM मोदींच्या दौऱ्यांसाठी Air Forceचं नवं विमान, क्षेपणास्त्र हल्लाही परतवणार

पुण्यात कसब्यातून मनसेचे अजय शिंदे यांच्यासाठी ही सभा होणार होती. भाजपच्या मुक्ता टिळक यांना त्यांनी आव्हान दिलं होतं. या मतदारसंघात शिवसेनेच्या विशाल धनवडे यांनी बंडखोरी केलीय तर काँग्रेसचे अरविंद शिंदे ही मैदानात आहेत. गिरीश बापट खासदार होऊन दिल्लीत गेल्याने भाजपने महापौर मुक्ता टिळक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. पुण्यात मनसेचा जनाधार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी राज यांच्या या सभेकची कार्यकर्ते आतुरतेने वाट पाहात होते. मात्र त्यांचा हिरमोड झालाय. आता मनसे राज ठाकरेंच्या सभेची दुसरी तारीख ठरविणार आहे.

Ambulance उशिरा पोहोचल्याने मुख्यमंत्र्यांच्याच भावाचा झाला मृत्यू

राज ठाकरेंनी राखला कार्यकर्त्याचा मान

राज ठाकरे यांचं भाषण हे कार्यकर्त्यांसाठी पर्वणी असतं. त्यांच्या स्टाईलवर फिदा होणाऱ्या तरुणांचा एक मोठा वर्ग मनसेकडे आहे. राज यांची ही क्रेझ कमी झालेली नाही. राज ठाकरेही आपल्या कार्यकर्त्यांची कायम काळजी घेत असतात. पुण्यात आल्यावर अशाच एका कार्यकर्त्याची विनंती राज ठाकरेंनी मानली आणि त्या कार्यकर्त्याने घेतलेली नवी कोरी कार राज यांनी चालवून बघितली. खुद्द राज ठाकरेंनी आपण घेतलेली कार चालवल्यामुळे आपल्याला झालेला आनंद व्यक्त करू शकत नाही अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष सचिन ननावरे यांनी व्यक्त केलीय.

खुशखबर...50 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारने दिलं 'हे' दिवाळीचं गिफ्ट

सचिन हे पुण्यात विद्यार्थ्यांमध्ये मनसेचं काम करतात. त्यांना राज ठाकरेंचं असलेलं गाड्यांवरचं प्रेम माहित आहे. नवरात्रीचा मुहूर्त साधत सचिन यांनी नवी कार घेतली होती. कुठल्याही मध्यवर्गीयाचं कार घेणं हे स्वप्न असतं. त्यामुळे सचिन आणि त्याचं कुटुंबीय आनंदात होतं. त्यातच राज ठाकरे हे पुण्यात प्रचारासाठी येणार असल्याचं त्यांना माहित होतं.

'पैसे नसतील तर बायकोला पाठव' मुथूट होमफिनच्या महिला एजंटचं धक्कादायक विधान

आपली नवी कोरी कार राज ठाकरेंनी चालवावी अशी त्याची इच्छा होती. त्याने ची इच्छा राज ठाकरेंना बोलून दाखवली. राज यांनीही आपल्या कार्यकर्त्याचा मान राखत त्याला दुसऱ्या दिवशी कार आपल्या निवासस्थानी घेऊन यायला सांगितली. राज ठाकरेंनी होकार देताच सचिन यांनी सर्व जय्यत तयारी करत कार राज ठाकरेंच्या घरी आणली. राज यांनीही आस्थेने सर्व चौकशी करत स्वत:ती कार चालवली आणि सचिनला काही टिप्सही दिल्या.कार चालवताना काळजी घे, नियमांचं पालन कर असा सल्ला द्यायलाही ते विसरले नाही.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 9, 2019, 7:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading