पुणे, 18 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) हे पुण्याच्या दौऱ्यावर (Raj Thackeray Pune tour) आहेत. ये त्या 21 मे रोजी राज ठाकरे यांची पुण्यात जाहीर सभा (Raj Thackeray Rally in Pune) होणार आहे. मात्र, पावसाच्या शक्यतेमुळे राज ठाकरे यांची सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा घेऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभांचा धडाका लावला आहे. मुंबई, औरंगाबादपाठोपाठ आता 21 तारखेला पुण्यात सभेचं आयोजन करण्यात आले होते. मात्र, दोन दिवसांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
(पुणे : पत्नीला मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास सांगे; स्वत: कोपऱ्यात उभं राहून...)
विशेष म्हणजे, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी 'राज ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारण्याचं काहीही कारण नाही. परवानगी मागितली तर पोलीस आयुक्त परवानगी देतील. पोलीस आयुक्तांनी घालून दिलेल्या नियमांनुसार राज ठाकरेंनी सभा घेण्यासाठी काहीही हरकत नाही' असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या या विधानामुळे राज ठाकरेंच्या सभेचा मार्ग मोकळा झाला होता. पण, आता पावसाच्या शक्यतेमुळे सभा रद्द केली आहे.
राज ठाकरेंनी खरेदी केली 50 हजारांची पुस्तकं
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे (Pune) दौऱ्यावर आहेत. याच दरम्यान मंगळवारी (17 मे 2022) राज ठाकरेंनी पुण्यातील अक्षरधारा बुक गॅलरीला (akshardhara book gallery) भेट दिली. यावेळी राज ठाकरे यांनी तेथे रात्री उशीरापर्यंत जवळपास दीड तास पुस्तक खरेदी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांनी जवळपास 50 हजार रुपयांची पुस्तके पुण्यातून खरेदी केली आहेत.
(राज्यसभेसाठी संभाजीराजेंसमोर शिवसेनेचाच पर्याय? सेना खासदारचे सूचक विधान)
या संदर्भात अक्षरधारा बुक गॅलरीचे संचालक रमेश राठिवडेकर यांनी सांगितले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुक गॅलरीला भेट दिली. जवळपास त्यांनी दीड तास पुस्तके पाहिली. प्रामुख्याने त्यांनी ऐतिहासिक, सामाजिक विषयाची पुस्तके, कला, आत्मचरित्र अशी जवळपास 50 हजार रुपयांची पुस्तके त्यांनी खरेदी केली आहेत.
राज ठाकरे यांच्याकडे यापूर्वी पुस्तके होती पण त्यांची काही पुस्तके कुणालातरी देण्यात आली. त्यानंतर अशी पुस्तके त्यांनी पुन्हा खरेदी केली. मृत्यूंजयची डिलक्स आवृत्ती, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे राजा शिवछत्रपती इंग्रजी पुस्तक खरेदी केलं असंही रमेश राठिवडेकर यांनी सांगितले
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.