पुणे 04 फेब्रुवारी : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुळ पिंड हा व्यंकचित्रकाराचा आहे हे आज पुण्यात पुन्हा एकदा दिसून आलं. CAAच्या विरोधातला मुंबईतल्या मोर्चाची गडबड असतानाही ते पुण्यात आज व्यंगचित्राच्या एका कार्यक्रमाला खास उपस्थित होते. झील एज्युकेशन तर्फे पुण्यात व्यंगचित्र कार्य शाळेचे आयोजन करण्यात आलं होतं. बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या कार्यशाळेचं राज ठाकरे यांनी उद्घाटन केलं. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी राजकारणावर कुठलंही भाष्य केलं नाही. या कार्यक्रमात राज हे व्यंगचित्रही रेखाटतील असं बोललं जात होतं मात्र हाताच्या दुखण्यामुळे सध्या आपण व्यंगचित्र काढू शकत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.
राज ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले, आज इथे पालक असायला पाहिजे होते म्हणजे त्यांना समजलं असतं व्यंगचित्र म्हणजे काय असतं ते. मी केवळ व्यंगचित्राशी संबंधीत कार्यक्रम आहे म्हणून आलो असं त्यांनी स्पष्ट केलं. राज्य सरकार जेव्हा चित्रकला हा विषय वैकल्पिक म्हणून टाकते तेव्हा अशा संस्थांचं महत्व कळतं असं त्यांनी सांगितलं.
हिंगणघाटमध्ये संतापाची लाट, प्राध्यापिकेच्या मेडिकल रिपोर्टमुळे चिंता वाढली
ते पुढे म्हणाले, प्रत्येकाच्या आत एक कला असते. ती त्याने ओळखली पाहिजे. शिक्षणाला Degree लागते. कलेला नाही. मी जे. जे. स्कूलमध्ये शिकलो पण माझ्याकडे डिग्री नाही. उत्तम कलेला कधीच मरण नाही. मला राजकीय व्यंगचित्र काढायची होती. ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचं प्रात्यक्षिक पहिल्यांदाच बघितल्याचं त्यांनी सांगितलं. या वयातही त्यांच्या हात आणि रेषा स्थिर राहतो असं कौतुकही त्यांनी केलं.
सगळ्यांचा जीव वाचवण्यासाठी धडपडला पण त्याच्यावर काळाचा घाला, अपघातात जागीच ठार
मला व्यंगचित्र काढायलं होतं मात्र टेनिस एलबो झाल्याने सध्या व्यंगचित्र काढू शकत नाही असंही ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.