Home /News /pune /

खंडणी बहाद्दर मनसे पदाधिकाऱ्याला टोकन घेताना रंगेहाथ पकडलं, पुण्यात कारवाई

खंडणी बहाद्दर मनसे पदाधिकाऱ्याला टोकन घेताना रंगेहाथ पकडलं, पुण्यात कारवाई

तक्रार मागे घेण्यासाठी कंपनीकडे मागितली होती 20 लाखांची खंडणी

शिरुर, 22 डिसेंबर: कंपनीमुळे प्रदूषण होत असल्याची तक्रार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे (Maharashtra Pollution Control Board) करण्यात आली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी महामंडळाच्या रिझनल ऑफिसरच्या वतीनं मनसे पदाधिकाऱ्यानं (MNS Party Worker) संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्याकडे 20 लाखांची खंडणी (Ransom) मागितली. त्यातील टोकन (bid) म्हणून 1 लाख रुपये स्वीकारताना मनसे पदाधिकारी कैलास नरके (MNS Leader Kailas Narke) याला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं. याप्रकरणी मनसे पदाधिकाऱ्यासह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा...मुंबई महापालिकेत नोकरी देण्याचं आमिष दाखवून 500 जणांना कोट्यवधींचा गंडा कैलास नरके (रा. हनुमान नगर,तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) असं अटक केलेल्या मनसे पदाधिकाऱ्याचं नाव आहे. तर त्याच्यासह आशिष अरबाळे, पंढरीनाथ साबळे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ वाकडेवाडी येथील रिझनल ऑफिसर डॉ. जितेंद्र संघेवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कपील सुभाष पाटील (वय 42, रा. लोढा बेलमांडो, गहुंजे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाटील हे चिंचवड एमआयडीसीमधील स्टार इंजिनिअर्स इंडिया या कंपनीत सीआयओ पदावर काम करतात. आरोपी आशिष अरबाळे हा पाटील यांच्या कंपनीत कन्सल्टंट म्हणून काम करतो. आशिष याने पाटील यांच्या स्टार इंजिनिअर्स इंडिया कंपनीची माहिती आरोपी पंढरीनाथ साबळे याला दिली. पंढरीनाथ साबळे याच्या माहितीवरून मनसे पदाधिकारी कैलास नरके याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या वाकडेवाडी येथील कार्यालयात स्टार इंजिनिअर्स इंडिया या कंपनीच्या विरोधात तक्रार दिली. ही तक्रार मागे घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे रिझनल ऑफिसर आरोपी डॉ. जितेंद्र संघेवार याच्या वतीने कैलास याने फिर्यादी पाटील यांच्याकडे 20 लाख रुपयांची खंडणी मागितली. हेही वाचा..कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही, राम मंदिरावरून देवेंद्र फडवणीसांचा पलटवार त्या खंडणीतील टोकन रक्कम म्हणून एक लाख रुपये देण्याचे ठरलं. त्यानुसार पुणे-नगर रोडवर कल्याणीनगर येथील हयात हॉटेलमध्ये टोकन देण्याचे ठरलं. दरम्यान पाटील यांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी मनसे पदाधिकारी कैलास नरके याला एक लाख रुपये रकमेचे पाकीट खंडणी म्हणून घेताना पोलिसांनी रंगहाथ पकडलं. या प्रकरणी पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Maharashtra, MNS, Pune, Pune crime, Raj Thackeray

पुढील बातम्या