मनसेचा उमेदवार 'चंपा'ची चंपी करणार, राज ठाकरेंची चंद्रकांत पाटलांवर टीका

मनसेचा उमेदवार 'चंपा'ची चंपी करणार, राज ठाकरेंची चंद्रकांत पाटलांवर टीका

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती असताना सत्ताधारी निवडणुकांच्या प्रचारात मग्न होते. त्यादरम्यान काय झालं? तर कोल्हापूरचे एक मंत्रीच पुण्यात वाहत आला. - राज ठाकरे

  • Share this:

पुणे, 14 ऑक्टोबर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी (14 ऑक्टोबर) मनसेचे उमेदवार अजय शिंदे यांच्या प्रचारासाठी कसबा येथे जाहीर सभा घेतली. राज ठाकरे यांची ही पुण्यातील पहिली सभा होती. या सभेमध्ये राज ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला. चंद्रकांत पाटील हे कोथरूडमधून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. 'महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती असताना सत्ताधारी निवडणुकांच्या प्रचारात मग्न होते. त्यादरम्यान काय झालं? तर कोल्हापूरचे एक मंत्रीच पुण्यात वाहत आला. मनसेचा उमेदवार (अजय शिंदे) या चंपाची चंपी करणार', अशा शब्दांत राज यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

मनसे उमेदवार करणार 'चंपा'ची चंपी - राज 

राज ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात होताच सभेसाठी जमलेल्या नागरिकांनी मोठमोठ्या आवाजात चंद्रकांत पाटील यांच्या नावाचा उल्लेख करण्यास सुरुवात केली. त्यावेळेस राज यांनी 'काय बोलत आहात? असा प्रश्न विचारातच जनतेमधून 'चंपा' असं उत्तर आलं. राज यांनीही 'चंपा' म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. पुणेकर नावं ठेवण्यात पटाईत आहेत, असं म्हणत राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला हाणला.

तगडा विरोधी नेता हवा - राज ठाकरे

'बहुमताचं सरकार कुणालाही न जुमानता निर्णय घेत असतं. हे का होतं? कारण त्यांच्यासमोर तगडा विरोधी पक्ष नसतो. ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप लावले तेच आज भाजपात गेले आहेत. काँग्रेसचा विरोधी पक्षनेताही भाजपात गेला. म्हणजे इथूनही तेच राज्य करणार तिथूनही तेच राज्य करणार. ही तुमच्याशी प्रतारणा नाही का?. आम्हाला विरोधासाठी विरोध करणारा 'विरोधी पक्ष' व्हायचं नाही. सरकारने एखादं चांगलं काम केलं तर खुल्या मनाने अभिनंदन करू पण जनतेवर अन्याय करायचा प्रयत्न झाला तर निडरपणाने सरकारला धारेवर धरू.' असं म्हणत राज ठाकरे भाजपसह, काँग्रेस-राष्ट्रवादीवरही निशाणा साधला.

(वाचा :  ED मुळे लाव रे तो व्हिडीओ बंद झाला? राज ठाकरेंनी दिलं उत्तर)

(पाहा : VIDEO :..मग मोदी-शहा सभा का घेताय? अजित पवारांचा फडणवीसांना टोला)

उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

'पुण्यात भाजपने शिवसेनेला शिल्लक ठेवलं नाही. नाशिक, पुण्यासारख्या मोठ्या शहरात शिवसेनेला युतीत एक जागा मिळत नाही? कुठून येते ही हतबलता. माननीय बाळासाहेब ठाकरे असते तर भाजपची असं वागायची हिम्मत झाली नसती. मी जरी असतो तरीही यांची अशी वागण्याची हिम्मत झाली नसती', असं म्हणत राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट शाब्दिक हल्ला चढवला.

खड्ड्यांवर सरकारवर हल्लाबोल

स्मारकांवरून टीका

शेतकरी आत्महत्यावरून सरकारवर टीका

आज शेतकरी आत्महत्या करत आहेत. सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा यवतमाळ जिल्हा प्रसिद्ध आहे. मुख्यमंत्र्यांची सभा असताना एका शेतकरी बांधवाने आत्महत्या केली. येणार तर आपलंच सरकार असा भाजपाचा टी शर्ट घालून त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली.

मेक इन महाराष्ट्रवरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा

'ज्या वेगात नोकऱ्या जात आहेत, ते पाहता प्रत्येक तरुणाच्या मनात एक धाकधूक आहे कि, 'माझी नोकरी कधीही जाऊ शकते'. ह्याचं कारण सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे आलेली भीषण आर्थिक मंदी', असं म्हणत राज यांनी सरकारला धारेवर धरलं. गेल्या आठवड्यात राज ठाकरे यांची पुण्यातील सभा पावसामुळे रद्द करण्यात आली होती. दरम्यान आज झालेल्या जाहीर सभेदरम्यान राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप,शिवसेनेसह विरोधी पक्षांवरही सडकून टीका केली.

VIDEO : बाळासाहेब असते तर हिंमत झाला नसती, राज ठाकरेंचं विधानसभेतलं सर्वात मोठं वक्तव्य

First published: October 14, 2019, 8:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading