MLC Election Results 2020 : पुण्यात भाजपला धक्का, राष्ट्रवादीची जोरदार मुसंडी

MLC Election Results 2020 : पुण्यात भाजपला धक्का, राष्ट्रवादीची जोरदार मुसंडी

पुण्यात खरी लढत भाजपचे संग्राम देशमुख आणि राष्ट्रवादीचे अरूण लाड यांच्यात आहे. जो पक्ष जास्त मतदान घडवून आणेल त्याचा विजय निश्चित समजला जाणार आहे.

  • Share this:

पुणे, 03 डिसेंबर : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी मतमोजणीला सुरूवात झाली आहे. धुळ्यात भाजपने विजय मिळवला आहे. पण, सर्वांचं लक्ष लागून असलेल्या पुण्यातून भाजपला धक्का बसला आहे. पुण्यात भाजप पिछाडीवर  आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांनी मुसंडी मारली आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक मतमोजणीला दुपारी 3 वाजेच्या सुमारास सुरुवात झाली. निकालाचा पहिला प्रथम पसंतीचा कल हाती आला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड यांनी आघाडी घेतली आहे. भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख पिछाडीवर आहे. तर

शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे नेते जयंत आसगावकर यांची आघाडी कायम आहे.

अमरावतीमध्ये भाजपला जबर धक्का, अपक्ष उमेदवाराची महाविकास आघाडीला टक्कर

पुण्यात खरी लढत भाजपचे संग्राम देशमुख आणि राष्ट्रवादीचे अरूण लाड यांच्यात आहे. जो पक्ष जास्त मतदान घडवून आणेल त्याचा विजय निश्चित समजला जाणार आहे.  पण मनसेच्या रूपाली पाटील यांनी जास्त मतं घेतली तर त्याचा फटका भाजपला बसू शकतो. पुणे पदवीधरमधून मागील वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील विजयी झाले होते. पण ते आता कोथरूडमधून विधानसभेत गेल्याने यावेळी सांगलीचे संग्राम देशमुख भाजपतर्फे मैदानात आहेत. तर राष्ट्रवादीकडून गेल्या वेळी थोड्याफार फरकाने पराभूत झालेले अरूण लाड पुन्हा नशीब आजमावत आहेत.

पुणे पदवीधर शिक्षकसाठी विजयाचा कोटा ठरण्यासाठी रात्रीचे 9 वाजणार

दरम्यान,  पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतमोजणी प्रक्रियेला पुण्यातल्या बालेवाडी इथल्या श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात सुरुवात झाली आहे.  या दोन्ही मतदारसंघात निकाल पहिल्या पसंतीच्या मतामध्येच  लागणार की पुढील फेऱ्याची मतमोजणी करावी लागणार याबाबतचे चित्र पदवीधरसाठी रात्री नऊ वाजताच्या सुमारास तर शिक्षकसाठीचे चित्र साधारण सायंकाळी 7 वाजेपर्यंत स्पष्ट होऊ शकते, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.

वडिलांच्या मृत्यूनंतरही केमार रोच मैदानात, सांत्वन करताना केन विल्यमसन भावुक!

दरम्यान, सकाळी आठ वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. सुरवातीला विभागातील पाच जिल्ह्याच्या मतपत्रिका तसंच पोस्टल मत पत्रिका एकत्र करण्यात आल्या. पदवीधर साठी 867 पोस्टल तर शिक्षकसाठी  32 पोस्टल मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत या सर्व मतपत्रिका सरमिसळ करण्याचे काम सुरू असून  ही प्रक्रिया पूर्ण व्हायला दुपारचे दोन वाजणार आहेत त्यानंतर दुपारी 3 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार असून वैध अवैध मत बाजूला करत असतानाच पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी केली जाणार आहे.

औरंगाबादेत तणाव! तरुणीवरून झालेल्या वादातून दोन गटात फ्री स्टाईल, VIDEO आला समोर

पोस्टल मतदानासह पदवीधर मतदारसंघासाठी 2 लाख 47 हजार 917 तर शिक्षकसाठी 53 हजार19 इतके मतदान झाले आहे.  पहिल्या पसंतीच्या मतामध्येच विजय मिळवण्यासाठी वैध मतदान भागिले 2, अधिक 1 मत  आवश्यक आहे. त्यामुळे एकतर्फी निवडणूक झाल्यास रात्री नऊ वाजता निकाल अपेक्षित आहे. पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण होऊ शकला नाही तर दुसऱ्या पसंतीची मते मोजली जाणार आहेत आणि ही प्रक्रिया करण्याची वेळ आल्यास त्याच्या पदवीधरसाठी 60 फेऱ्या तर शिक्षक साठी 32 फेऱ्या घ्याव्या लागणार आहेत. प्रत्येक फेरीसाठी अंदाजे अर्धा तास वेळ गृहीत धरल्यास निकाल लागण्यासाठी आज रात्री 9 नंतर पुढे 30 तास पदवीधरसाठी लागू शकतात तर शिक्षक साठी 16 तास लागू शकतात असा प्रशासनाचा अंदाज आहे.

Published by: sachin Salve
First published: December 3, 2020, 5:07 PM IST
Tags:

ताज्या बातम्या