मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

Mission Paani: तृतीयपंथी समूहानं महाराष्ट्रात उभारला आगळावेगळा पाणीप्रकल्प

Mission Paani: तृतीयपंथी समूहानं महाराष्ट्रात उभारला आगळावेगळा पाणीप्रकल्प

तृतीयपंथी समूह असंख्य अडचणींचा सामना करत जगत असतो. मात्र यातूनही मार्ग काढत स्वावलंबन आणि प्रतिष्ठा मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.

तृतीयपंथी समूह असंख्य अडचणींचा सामना करत जगत असतो. मात्र यातूनही मार्ग काढत स्वावलंबन आणि प्रतिष्ठा मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.

तृतीयपंथी समूह असंख्य अडचणींचा सामना करत जगत असतो. मात्र यातूनही मार्ग काढत स्वावलंबन आणि प्रतिष्ठा मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 26 जानेवारी : तृतीयपंथी समाजातील (Transgender community) व्यक्तींनी सगळ्या अडचणी आणि संघर्षातून मार्ग काढत काहीतरी विधायक केल्याची अनेक उदाहरणं आपण वाचत-पाहत असतो. असंच एक उदाहरण पुण्याजवळच्या (Pune) वाघोली (Wagholi) इथून समोर आलं आहे.

इथं तृतीयपंथी समूहातील व्यक्तींनी एकत्र येत एक पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प (water plant) उभारला आहे. हा प्रकल्प पूर्णतः पुण्यामधील तृतीयपंथी समूहातील व्यक्ती चालवतात. तृतीयपंथी समूहातील व्यक्तींना आर्थिक स्वावलंबन मिळावे यासाठी 'किन्नर सर्व्हीसेस'च्या (Kineer services) माध्यमातून हा प्रकल्प काही आठवड्यांपूर्वी पुणे-नगर रस्त्यावर उभारला गेला.

'किन्नर सर्विसेस' हा तृतीयपंथी समूहातील एक मोठं नेतृत्व असलेल्या लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांचा उपक्रम आहे. हा प्रकल्प चालवण्यासाठी चार महिलांची नियुक्ती केली गेली आहे. ममता, राणीताई पटेल, शक्ती आणि प्रेरणा अशी त्यांची नावं आहेत. या चौघीजणींना विशिष्ट रक्कम पगाराच्या रूपात दिली जाते.

एका टॅब्लॉइडसोबत बोलताना 33 वर्षीय ममतानं आपला अनुभव सांगितला. ती म्हणते, 'या नोकरीतून माझं आयुष्यच बदलून गेलं आहे. ऑगस्टपर्यंत मी माझ्या सहकारी मैत्रिणींसोबत बाजारात भिक्षा मागायला जायचे. याशिवाय लग्नात नाचूनही थोडीबहुत कमाई व्हायची. मात्र सतत अपमान आणि हेटाळणी वाट्याला येत असे. आता आयुष्यात पहिल्यांदाच आदर, सन्मान काय असतो हे कळते आहे.'

तिची सहकारी ममता पाण्याचं व्यवस्थापन आणि पाणीपुरवठा करण्यासाठी विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांना (MNC) भेटी देणं या गोष्टी करते. तिला तिच्या पालकांनी तृतीयपंथी असल्याने नाकारलं होतं. मात्र या प्रकल्पासोबत जोडलं गेल्यानंतर तिला अगदी सुरक्षारक्षकापासून ते उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांकडून आदर मिळतो आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातून सध्या 200 कॅन्स पाणी पुरवलं जातं. मात्र आता अजून तृतीयपंथीय त्यांच्या टीमसोबत जोडले गेल्यानंतर हे उत्पादन वाढवलं जाणार आहे. किन्नर सर्व्हिसेस या प्रकल्पाचे समन्वयक मनीष जैन यांनी सांगितलं, की पूर्णतः तृतीयपंथीयांनी चालवलेला हा प्रकल्प पहिलाच असा अनोखा प्रयोग आहे. समाजात तृतीयपंथी समूहाबाबत अजून खूप जनजागृती होण्याची गरज आहे. मात्र दोन्ही बाजूंनी समान प्रयत्न झाले पाहिजेत. पुढेही अधिकाधिक तृतीयपंथीयांना रोजगार देण्याचा आमचा प्रयत्न असेल.

हार्पिक-न्यूज 18 मिशन पानी (Mission Paani) कॅम्पेनशी जोडून घ्या. पाणी वाचवण्याची शपथ घ्या आणि या लिंकवर सर्व अपडेट्स मिळवत रहा.

First published:

Tags: Transgender, नेटवर्क 18