• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • आधी हातीच नस कापली नंतर घेतला गळफास, मिस पिंपरी चिंचवड विशाखाची आत्महत्या

आधी हातीच नस कापली नंतर घेतला गळफास, मिस पिंपरी चिंचवड विशाखाची आत्महत्या

Visakha Sonkamble commits suicide : विशाखा सोनकांबळे ह्या योगा प्रशिक्षक देखील होत्या. तसंच त्या मिस पिंपरी - चिंचवड स्पर्धेच्या (Miss Pimpri Chinchwad ) मानकरी देखील ठरल्या होत्या.

  • Share this:
पिंपरी चिंचवड, 20 सप्टेंबर : मिस पिंपरी-चिंचवड स्पर्धेच्या मानकरी ठरलेल्या विशाखा दीपक सोनकांबळे ( Visakha Sonkamble commits suicide) या महिलेने आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशाखा यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. विशाखा यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. (Miss Pimpri Chinchwad Visakha Sonkamble commits suicide) मिळालेल्या माहितीनुसार,  सांगवी भागातील मधुबन सोसायटीमधील राहत्या घरात विशाखा सोनकांबळे यांनी सोमवारी सकाळी गळफास घेत आत्महत्या केली. विशाखा सोनकांबळे ह्या योगा प्रशिक्षक देखील होत्या. तसंच त्या मिस पिंपरी - चिंचवड स्पर्धेच्या (Miss Pimpri Chinchwad ) मानकरी देखील ठरल्या होत्या. त्यामुळे विशाखाने आत्महत्या करण्या सारखा टोकाचं पाऊल उचलल्याने पिंपरी - चिंचवड शहरा मध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. SRPF Recruitment: राज्य राखीव पोलीस बल मुंबई इथे 'या' पदासाठी नोकरीची संधी विशाखा या आपल्या पती दीपक सोनकांबळे आणि दोन मुलांसह मधूबन सोसायटीमध्ये राहत होत्या. रविवारी रात्री विशाखाचे पती आपल्या मुलांसोबत घेऊन हॉलमध्ये झोपले होते आणि विशाखा आतमध्ये रूममध्ये झोपून होती. त्या दरम्यान विशाखाने अगोदर हाताची नस कापली नंतर गळफास घेतला आहे. पाकिस्तानची मोठी नाचक्की! न्यूझीलंडपाठोपाठ इंग्लंडनेही केला दौरा रद्द विशाखा यांनी आत्महत्या का केली हे अजून मात्र समजू शकले नाही. मात्र, सांगवी पोलिसांनी विशाखा सोनकांबळे आत्महत्या संदर्भात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.
Published by:sachin Salve
First published: