पुण्यात चारित्र्याच्या संशयावरून आईच्या प्रियकराने केला अल्पवयीन मुलीचा खून

News18 Lokmat | Updated On: Sep 3, 2019 05:43 PM IST

पुण्यात चारित्र्याच्या संशयावरून आईच्या प्रियकराने केला अल्पवयीन मुलीचा खून

इंदापूर, 3 सप्टेंबर: पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथे चारित्र्याच्या संशयावरून एका 15 वर्षीय मुलीचा खून करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीचा खून करण्याआधी तिला झाडाला बांधून तिचे पाय मोडले, नंतर तिच्या डोक्यावर दांडुक्याने वार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला. याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी एकावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गणेश खरात असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, अल्पवयीन मुलीची आई गेल्या 12 वर्षांपासून पतीपासून विभक्त राहते. ती आपल्या मुलीसह आरोपी गणेश खरातसोबत निमसाखर येथे राहत होती. दरम्यान, मुलगी एका मुलाशी बोलत होती. याच कारणावरून संतापलेल्या गणेश खरात याने काल (सोमवारी) रात्री दोन्ही मायलेकींना आपल्या दुचाकी वाहनावर बसवून जवळच्या निर्जनस्थळी वनक्षेत्रात नेले. मुलीचे पाय आणि कपाळावर दांडुक्याने जबर मारहाण केली. दरम्यान मुलीला सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिच्या आईलाही बेदम मारहाण केली. गंभीर मारहाणीनंतर जखमी मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आरोपीसोबत मुलीच्या आईचे प्रेमसंबंध...

आरोपी गणेश खरात आणि मृत मुलीच्या आईचे प्रेमसंबंध आहे. त्यामुळे पतीपासून विभक्त झाल्यानंतर दोन्ही मायलेकी आरोपीच्या घरी राहत होत्या.आरोपीचा मुलीच्या चारित्र्यावरून संशय घेत होता. एक मुलाशी बोलत असल्याच्या क्षुल्लक कारणावरून गणेश खरात याने हे कृत्य केले. याप्रकरणी वालचंदनगर पोलिस ठाण्यात मृत मुलीच्या आईचा प्रियकर समीर उर्फ गणेश हनुमंत खरात (रा. निमसाखर, ता.इंदापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

VIDEO: नाना पाटेकर यांनी 'या' कारणासाठी केलं मुनगंटीवार यांचं कौतुक

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: pune
First Published: Sep 3, 2019 05:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...