S M L

पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास आता पुणे क्राईम ब्रांचकडे

पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास आता पुणे क्राईम ब्रांच करणार असल्याची माहीती पुणे पोलिसांनी मुंबई हायकोर्टाला दिली आहे.

Renuka Dhaybar | Updated On: May 26, 2018 03:29 PM IST

पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास आता पुणे क्राईम ब्रांचकडे

पुणे, 26 मे : पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास आता पुणे क्राईम ब्रांच करणार असल्याची माहीती पुणे पोलिसांनी मुंबई हायकोर्टाला दिली आहे. तसेच याप्रकरणाचा तपास करणाऱ्या संबंधित तपासअधिका-याची पोलीस उपायुक्तांमार्फत चौकशी करणार असून पोलीस अधिकारी दोषी आढल्यास त्याच्यावरही कारवाई करणार अशी माहीतीही पुण्याचे सहआयुक्त रवींद्र कदम यांनी हायकोर्टात उपस्थित राहून दिली.

न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर शनिवारी यावर सुनावणी झाली. हायकोर्टानं ५ जूनपर्यंत पुणे पोलिसांना तपासाच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत. आपल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पुणे पोलिसांकडून काही प्रयत्न होत नसल्याचे पाहून कुटुंबियांनी अखेरीस १४ मे रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय.

या प्रकरणातील मुख्य आरोपी हा पुण्यातील नामचीन गुंड श्वेतांग निकाळजे उर्फ श्वेत्या असून त्याच्याविरोधात पुणे सत्र न्यायालयात गोळीबार करणे, हत्येचा प्रयत्न, दरोडा, एटीएम फोडी असे अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्यावरील राजकीय वरदहस्तामुळे पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करतायत असा आरोप कुटुंबियांकडून हायकोर्टात करण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 26, 2018 03:29 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close