रामदास आठवलेंनी पातळी सोडली..? चक्क अण्णाभाऊ साठे यांच्या गीताचे केले विडंबन

रामदास आठवलेंनी पातळी सोडली..? चक्क अण्णाभाऊ साठे यांच्या गीताचे केले विडंबन

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी चक्क संयुक्त महाराष्ट्राच्या नवनिर्मितीमध्ये आपले मोलाचे योगदान देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या गीताचे विडंबन केले.

  • Share this:

गोविंद वाकडे, (प्रतिनिधी)

पिंपरी चिंचवड, 3 ऑगस्ट- नेहमी हिणकस स्वरूपाच्या कविता ऐकवून स्वतःला चर्चेत ठेवणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी चक्क संयुक्त महाराष्ट्राच्या नवनिर्मितीमध्ये आपले मोलाचे योगदान देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या गीताचे विडंबन केले. तर पत्रकारांशी बोलताना मध्येच बँड वाजवला म्हणून वाजंत्रीना शिविगाळ करत रामदास आठवले यांनी आपली पातळी सोडल्याचे समोर आले आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आठवले बोलत होते. 'माझी मयना गावाकडे राहिली आणि तो म्हणतो मी मुंबईकडे दुसरी पाहिली.' हे गीत मंत्रिमहोदयांनी कार्यक्रमात गायिले. आपण चुकीचे बोललो हे लक्षात येताच पुढे त्यांनी स्वतःला सावरूनही घेतले. अण्णांच्या गीतांचा खूप मोठा प्रभाव होता, त्या गीतांतून गावोगावी जागृती केली जात होती. त्यामुळे अण्णाचे चळवळीत मोठे योगदान असल्याचे म्हणत त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी आठवलेंनी यावेळी केली.

दुसरीकडे पत्रकारांशी बोलत असताना बँड सुरु झाला. याचा संताप चेहऱ्यावर दिसल्याने कार्यकर्त्यांनी बँड बंद करायला लावला. काहीवेळ थांबून त्यांनी पुन्हा बँड वाजवल्याने आठवले भलतेच वैतागले आणि त्यांनी अश्लील शिविगाळ केली. ही घटना कॅमेऱ्यातही कैद झाली आहे.

शरद पवारांनी आपल्या नेत्यांना सांभाळायला हवं...

Loading...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांना त्यांच्या नेत्यांनी सोडून जाऊ नये. पण, त्यांना सत्ता हवी असल्याने ते पक्ष सोडतायेत. तेव्हा पवारांनी इतरांवर आरोप करण्याऐवजी त्यांच्या नेत्यांना सांभाळायला हवं, अशी टीका रामदास आठवले यांनी या वेळी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत तोपर्यंत मी आहे आणि मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मोदी आहेत. त्यामुळे आम्ही दोघे असेपर्यंत सरकारला कोणीही धक्का लाऊ शकत नाही, असा इशाराही आठवलेंनी आपल्या शैलीत विरोधकांना दिला आहे.

VIDEO : ... आणि धुवांधार पावसात जीव धोक्यात घालून प्रवासी ट्रॅकवरून धावले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 3, 2019 07:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...