मराठी बातम्या /बातम्या /पुणे /'इंदापुरात मी पाटलांना घाबरतो' राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची जोरदार टोलेबाजी, म्हणाल्या...

'इंदापुरात मी पाटलांना घाबरतो' राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची जोरदार टोलेबाजी, म्हणाल्या...

Supriya Sule : पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे एका कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी जोरदार टोलेबाजी केल्याचं पहायला मिळालं. पाहूयात नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे....

Supriya Sule : पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे एका कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी जोरदार टोलेबाजी केल्याचं पहायला मिळालं. पाहूयात नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे....

Supriya Sule : पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे एका कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी जोरदार टोलेबाजी केल्याचं पहायला मिळालं. पाहूयात नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे....

    इंदापूर, 4 नोव्हेंबर : पुणे जिल्ह्यातील इंदापूर (Indapur Pune) तालुक्यात आयोजित एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) उपस्थित होत्या. या कार्यक्रमात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी केलेल्या विधानानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टोलेबाजी केली. सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टोलेबाजीवर एकच हशा पिकल्याचं पहायला मिळालं.

    पाटलांना मी इंदापुरात लई भीतो असे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपल्या भाषणात म्हटलं. दत्तात्रय भरणे यांनी हे वाक्य म्हणताच खासदार सुप्रिया सुळे यांनी त्या वाक्याचा धागा पकडत म्हटलं, राज्यमंत्री भरणे कुठल्या पाटलांना घाबरतात मला कळलं नाही. माझ्या दोन बहिणी देखील पाटलांच्या घरात दिल्या आहेत. माझे कुठले मेव्हणे तुम्हाला त्रास देतात? सुप्रिया सुळेंनी असे म्हणताच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, मी चेष्टेने म्हणालो..

    यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या.... तुम्ही म्हणता इंदापुरातील पाटलांना तुम्ही घाबरता पण कुस्तीत तर पाटलांना तुम्ही टेकवून ठेवलेत ना. आता काय राहिले तेव्हा... अशी कोटी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. इंदापूर विधानसभेत सलग दोन वेळा भाजपचे नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी पराभूत केले याचा उल्लेख खासदार सुळे यांनी केला.

    वाचा : काँग्रेसला झटका; लातूर जिल्हा बँक निवडणुकीत बाद ठरलेले विरोधकांचे 9 अर्ज वैध

    पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी येथील चिंकारा संरक्षण व जैवविविधता वन उद्यानामध्ये विकास कामांचे भूमिपूजन, वनपर्यटनानंतर कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हे विधान केलं होतं. भाषणात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, पाटलांना मी इंदापुरात लई भीतो.... त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या वाक्यावर कोटी करत तुम्ही तर पाटलांना चितपट केले ना असं म्हटलं.

    राज्यसरकारने भ्रष्टाचाराचे सगळे विक्रम मोडले - विखे पाटील

    तर दुसरीकडे आज अहमदनगरमध्ये भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राज्यातील सामान्य नागरिक आणि शेतकरी अडचणीत असताना आघाडी सरकारचे मंत्री मात्र स्वतःला लक्ष्मीकरता प्रसन्न करून घेत आहेत. राज्यातील जनता उपाशी आणि मंत्री तुपाशी अशी टीका भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

    वाचा : इंधन दर कपातीवर रोहित पवारांनी मानले केंद्र सरकारचे आभार, अन् दिला सल्ला

    माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज लोणी प्रवरानगर येथील प्रवरा शिक्षण संस्था आणि साखर कारखान्यात सपत्नीक लक्ष्मीपूजन केले. आघाडी सरकारवर लक्ष्मी रूसलीय की प्रसन्न आहे ? माहीत नाही मात्र हे स्वतःलाच लक्ष्मीकरता प्रसन्न करून घेत आहेत. आज राज्यातील सामान्य नागरिक, शेतकरी अडचणीत आहेत. मात्र महसूल गोळा करण्यात मंत्र्यांचा वेळ चाललाय. शेतकरी उपाशी आणि मंत्री तुपाशी अशी अवस्था झाली असल्याची घणाघाती टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलीय.

    First published:

    Tags: Pune, Supriya sule