पुणे, 22 जानेवारी : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) आज पुणे विभागातील म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी काढली. तब्बल 6477 घरांसाठी ही लॉटरी काढली जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. सर्व देशभर coronavirus ची साथ असूनही म्हाडाकडे तब्बल 53,000 अर्ज जमा झाले होते.
कोविड - 19 च्या पार्श्वभूमीवर अधिक गर्दी टाळता यावी यासाठी खबरदारी म्हणून या वेळी प्राधिकरणाने पुणे, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर मधील घरांसाठी लॉटरी ही पुण्यातील नेहरू मेमोरियल हॉलमध्ये काढायचं ठरवलं. त्याचबरोबर लॉटरीचं अधिवेशन YouTube वर बघण्याची सोय देखील केली गेली. लॉटरीच्या विजेत्यांना संदेशाद्वारेही सूचित केले जाईल आणि स्वीकारलेल्या अर्जांची यादी ही MHADA च्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी याबाबत बोलताना सांगितलं की,“आम्ही स्वस्त दरात घरे देत आहोत. बाजारभावापेक्षा या घरांची किंमत 30 ते 40 टक्के कमी आहे. बाजारपेठेत घरांची गरज असल्याचे निदर्शनास येत आहे. प्रशासनाने यात कोणताही दलाल नेमलेला नाही. परवडणार्या लोकांना घरे देण्याची ही पारदर्शक प्रक्रिया आहे. "
हे देखील वाचा - ‘या’ राज्य सरकारनं दोन वर्षांपासून रोखलं प्रमोशन, सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष!
नोंदणीची प्रक्रिया ही महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पुणे विभागासाठी सुरू करून दिली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Pune