मराठी बातम्या /बातम्या /पुणे /अन् कार्यकर्त्याने शरद पवारांसमोर पक्षातील गटबाजीचा पाढाच वाचला; पुण्यात नेमकं काय घडलं?

अन् कार्यकर्त्याने शरद पवारांसमोर पक्षातील गटबाजीचा पाढाच वाचला; पुण्यात नेमकं काय घडलं?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यात कार्यकर्त्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यात कार्यकर्त्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यात कार्यकर्त्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune (Poona) [Poona], India

पुणे, 5 जानेवारी :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला जिल्ह्यातील जवळपास सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या बैठकीला शरद पवार यांच्यासोबतच राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळेस पाटील हे देखील उपस्थित होते. या बैठकीत कार्यकर्त्यांनी शरद पवारांसमोर पक्षांतर्गत सुरू असलेल्या गटबाजीचा पाढाच वाचल्याचं पहायला मिळालं.

पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक  

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये पक्षात अंतर्गत गटबाजी सुरू असल्याची तक्रार कार्यकर्त्यांनी केली. तसेच साहेब पक्षातील गटतट दूर झाल्यास पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर आपली एक हाती सत्ता येईल असा दावाही या पदाधिकाऱ्यांनी बैठकीमध्ये केला. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळेस पाटील यांची देखील उपस्थिती होती.

पदाधिकाऱ्यांनी काय म्हटलं? 

या बैठकीला उपस्थित पादाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्यासमोर पक्षांतर्गत येणाऱ्या समस्या मांडल्या. पक्षांतर्गत गटबाजी सुरू असल्याचं या पादाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. साहेब पक्षातील गटतट दूर झाल्यास पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर आपली एक हाती सत्ता येईल, असं  पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. तसेच  कात्रज दूध संघ, पीएमआरडीए या सारख्या महत्त्वाच्या कमिट्यांवर पक्षातील लोकांना संधी मिळत नसल्याचेही या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना सांगितले.

First published:

Tags: Ajit pawar, NCP, Pune, Pune news, Sharad Pawar