मराठी बातम्या /बातम्या /पुणे /विजय वडेट्टीवारांकडून भुजबळांना शह देण्याचा प्रयत्न? पुण्यात MPSCच्या मुद्द्यावर संवाद बैठक

विजय वडेट्टीवारांकडून भुजबळांना शह देण्याचा प्रयत्न? पुण्यात MPSCच्या मुद्द्यावर संवाद बैठक

विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका मांडत आपण ओबीसी वर्गाच्या हक्कांसाठी संघर्ष करणार असल्याचं सांगितलं.

विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका मांडत आपण ओबीसी वर्गाच्या हक्कांसाठी संघर्ष करणार असल्याचं सांगितलं.

विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका मांडत आपण ओबीसी वर्गाच्या हक्कांसाठी संघर्ष करणार असल्याचं सांगितलं.

पुणे, 25 डिसेंबर : काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत पुण्यात एमपीएससी परीक्षार्थींची संवाद बैठक पार पडली. यावेळी परीक्षा सातत्याने पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता बोलून दाखवण्यात आली. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका मांडत आपण ओबीसी वर्गाच्या हक्कांसाठी संघर्ष करणार असल्याचं सांगितलं.

'मंत्री असलो तरी ओबीसी वर्गाच्या हक्कांसाठी यापुढेही लढत राहणार. टीका झाली तरी अजिबात मागे हटणार नाही. एमपीएससी नियुक्तीचा प्रश्न मार्गी लावणारच. मी 'पुन्हा पुन्हा' तारीख सांगणार नाही, पण काम नक्की करेन,' असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला लगावला.

'फक्त 25 तारखेपर्यंत थांबा, नक्कीच हा प्रश्न मार्गी लावतो. 25 तारखेला मराठा आरक्षण सुनावणी आहे. 25 तारखेच्या मराठा सुनावणीनंतर एमपीएससी परीक्षा पुन्हा सुरू करण्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल. जानेवारी संपेपर्यंत हा प्रश्न मार्गी लागलाच पाहिजे,' अशी भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वीच ओबीसी आरक्षण प्रश्नावरून सुरू असलेले मोर्चे रद्द करण्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतरही विजय वडेट्टीवार हे ओबीसींच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत ओबीसी समाजाच्या बैठकांना उपस्थित राहत असल्याचं चित्र आहे. तसंच उद्या नगरला वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात व्हीजेएनटीचे बाळासाहेब सानप ओबीसींचा जाहीर मेळावा घेत आहेत. त्यामुळे विजय वडेट्टीवार हे ओबीसी नेतृत्त्वावरून छगन भुजबळ यांना शह देण्याचा प्रयत्न करत आहेत का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

वडेट्टीवार यांच्या पुण्यातील भाषणातील ठळक मुद्दे :

- काही जण म्हणतील की, mpsc परीक्षार्थींच्या मेळाव्यात मंत्री असूनही वडेट्टीवार कसे हजर, पण मी वडेट्टीवार आहे... योगायोगाने ओबीसी खात्याचा मंत्री पण आहे

- प्रलंबित mpsc नियुक्त्या संदर्भात काल दोन तास कँबिनेटमध्ये खर्ची घातला, मुख्यमंत्र्यांसमोर हा प्रश्न लावून धरला

- 420 एमपीएससी परीक्षार्थींच्या नियुक्त्या रखडल्या आहेत...

- समांतर आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लावू

- महापोर्टलच्या कार्यपद्धतीबाबत तक्रारी आहेत, त्याची शासनाकडून दखल घेतली जाईल

First published:

Tags: Pune, Pune (City/Town/Village), Vijay wadettiwar