Home /News /pune /

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून मेधा कुलकर्णींचा पत्ता कट, 'हा' उमेदवार मैदानात

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून मेधा कुलकर्णींचा पत्ता कट, 'हा' उमेदवार मैदानात

पुण्यातून माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांना उमेदवारी देण्यात येणार अशी चर्चा होती. पण, त्यांच्या जागी दुसऱ्या नावाला पसंती देण्यात आली आहे.

    पुणे, 09 नोव्हेंबर : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघासाठी (Teacher Legislative Council Elections )भाजपकडून (BJP) उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पण, या यादीतून कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुणकर्णी (Medha Kulkarni) यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. पुण्यातून माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देण्यात येणार अशी चर्चा होती. पण, त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. पुणे पदवीधरसाठी संग्राम देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या जागेसाठी  महापौर मुरलीधर मोहोळ, रवींद्र भेगडे, अभाविपचे राजेश पांडे यांच्याही नावाची चर्चा होती पण, अखेर सर्व नावे वगळून सांगलीच्या संग्राम देशमुख यांचे नाव जाहीर झाले आहे. तर औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मागील निवडणुकीत शिरीश बोराळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते सतीश चव्हाण यांचा पराभव केला होता. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीकडून यंदा पुन्हा एकदा सतीश चव्हाण यांनाच उमेदवारी देण्याची शक्यता आहे. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमधून  संदीप जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.   तर दुसरीकडे अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी नितीन धांडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. 'आमचा मतदारसंघ मोठा आहे, मतदार सहा जिल्ह्यात विखुरलेले आहे. त्यामुळे कमी कालावधीत संपर्क साधने आव्हानात्मक असेल. त्यासाठी भाजपचे संगठन आणि डिजिटल प्रचार पद्धतीचा वापर करू, हे मतदारसंघ गंगाधरराव फडणवीस आणि त्यानंतर नितीन गडकरी यांचे राहिले आहे. त्यामुळे जबाबदारी मोठी आहे. मात्र, भाजपचा गड भाजपकडेच राहील असा विश्वास आहे', असं संदीप जोशी यांनी सांगितले. भाजपने पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांच्या पाचही जागा लढवण्याची तयारी केली आहे.  पुढील महिन्यात 1 डिसेंबर रोजी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. त्यानंतर तिसऱ्या दिवशी 3 डिसेंबरला निकाल लागणार आहे. भाजपचे उमेदवार औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ - शिरीष बोराळकर पुणे पदवीधर - संग्राम देशमुख नागपूर पदवीधर - संदीप जोशी अमरावती शिक्षक मतदारसंघ - नितीन धांडे
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या