'फॉरेन रिटर्न'पासूनच पुणेकरांना कोरोनाचा सर्वाधिक धोका

'फॉरेन रिटर्न'पासूनच पुणेकरांना कोरोनाचा सर्वाधिक धोका

पुण्यातील कोरानाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी परदेशातून येणाऱ्या नागरिकांना विमानतळावरूनच क्वारनटाईन करावे, अशी मागणी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंञ्यांकडे केली आहे.

  • Share this:

पुणे, 19 मार्च : पुण्यातील कोरानाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी परदेशातून येणाऱ्या नागरिकांना विमानतळावरूनच क्वारनटाईन करावे, अशी मागणी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंञ्यांकडे केली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 49वर गेली आहे तर देशात 170 हून अधिक रुग्ण कोरोनाग्रस्त असल्याचं आढळलं आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातही सर्वात जास्त रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत. कारण पुण्यात कोरोनाची साथ फॉरेन रिटर्न नागरिकांमुळेच फैलावत असल्याचं आढळून आलं आहे. त्यात भर म्हणून होम क्वारनटाईन केलेले काही लोक रस्त्यावरून फिरताना आढळून आल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. म्हणूनच पुढचे काही दिवसतरी फॉरेन रिटर्न पुणेकरांना विमानतळावरूनच क्वारनटाईन करावं अशी मागणी महापौरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

कोरोनामुळे जवळपास 50 टक्के सेवा, व्यावसाय आणि सुविधा बंद करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. लोकल, बस आणि मेट्रो सेवांवर भार न येण्यासाठी नागरिकांना मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे. कोरोना व्हायरसमुळे देशभरातील जनजीवनावर परिणाम झाला आहे. हा व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरू नये म्हणून प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहे. त्यामुळे अनेक राज्यांतील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यातच कोरोनाचा धोका लक्षात घेत आता CBSE बोर्डाने 10 आणि 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

!function(e,i,n,s){var t="InfogramEmbeds",d=e.getElementsByTagName("script")[0];if(window[t]&&window[t].initialized)window[t].process&&window[t].process();else if(!e.getElementById(n)){var o=e.createElement("script");o.async=1,o.id=n,o.src="https://e.infogram.com/js/dist/embed-loader-min.js",d.parentNode.insertBefore(o,d)}}(document,0,"infogram-async");

हे वाचा-इतर देशांच्या तुलनेत भारतात 'कोरोना'चा कमी प्रसार; घाबरू नका, मात्र काळजी घ्या

भारतीय रेल्वेने (Indian Railway) आज 19 मार्च रोजी अनेक रेल्वे रद्द केल्या आहेत. विविध कारणांसाठी या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. या रद्द झालेल्या रेल्वेंच्या यादीमध्ये एक्सप्रेस, पॅसेंजर ट्रेन्स तसंच काही स्पेशल रेल्वेसेवांचा समावेश आहे. रेल्वेकडून मिळालेल्या अधिकृत माहितीच्या आधारे आज एकूण 524 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये जनशताब्दी, सुपरफास्ट ट्रेन, मेल एक्सप्रेस आणि पॅसेंजर अशा ट्रेन्सचा समावेश आहे.

गरज असेल तरच बाहेर पडण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलं आहे. तर आरोग्याची काळजी घ्या आणि गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन ही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. तज्ज्ञांच्या मते, इराण, इटली आणि वुहानच्या तुलनेत भारतात कोरोनाव्हायरस पसरण्याची गती कमी आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाव्हायरसचं पसरण्याचं प्रमाण खूप कमी आहे. अतिशय गंभीर अशी परिस्थिती नाही. चीनच्या वुहानमधून जगभर पसरलेल्या कोरोनाव्हायरसने आतापर्यंत 2 लाखांपेक्षा जास्त लोकांना झाला आहे. 8 हजारपेक्षा जास्त मृत्यू झालेत.

हे वाचा-Coronavirus : पुण्यात उस्फूर्त Lock Down! ओळखू येणार नाहीत इतके मोकळे झाले रस्ते

First published: March 19, 2020, 3:29 PM IST

ताज्या बातम्या