गणेश विसर्जनाच्या शेवटच्या दिवसाआधी महापौरांनी पुणेकरांना केलं खास आवाहन

गणेश विसर्जनाच्या शेवटच्या दिवसाआधी महापौरांनी पुणेकरांना केलं खास आवाहन

'शेवटच्या दिवशीही पुणेकरांनी मोठा प्रतिसाद द्यावा,' असं आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांना केलं आहे.

  • Share this:

पुणे, 31 ऑगस्ट : 'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'आपल्या बाप्पाचं, आपल्याच घरी विसर्जन' या आवाहनाला पुणेकरांनी पहिल्या नऊ दिवसांत जवळपास 85 टक्के प्रतिसाद दिला असून याबद्दल पुणेकरांचे मनःपूर्वक धन्यवाद. शेवटच्या दिवशीही पुणेकरांनी मोठा प्रतिसाद द्यावा,' असं आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांना केलं आहे.

गणेश विसर्जनासाठी यंदा 15 क्षेत्रिय कार्यालयांतर्गत एकूण 191 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे उभारण्यात आली आहेत. तसेच ज्या नागरिकांस घरच्या घरी मूर्ती विसर्जन करणे शक्य नाही अशा नागरिकांसाठी पुणे महानगरपालिकेमार्फत तयार करण्यात आलेल्या विसर्जन हौदांची संख्याही वाढवण्यात आली आहे.

मागील गणेशोत्सव काळात 10 दिवसांत पुणे महानगरपालिका स्वच्छ सहकारी संस्थेमार्फत एकूण 9, 66, 333 किलो निर्माल्य गोळा करण्यात आले होते. या वर्षी 9 दिवसांत एकूण 31110 किलो निर्माल्य गोळा करण्यात आले आहे.

सन 2019 च्या गणेशोत्सव काळात 9 दिवसांत विसर्जन घाट, हाँद, टाक्या, कॅनॉल, नदीपात्र, तलाव, विहीर अशी सर्व ठिकाणे मिळून एकूण 1, 51, 945 मूर्ती विसर्जन झाले होते. तसेच एकूण 4029 मूर्ती दान स्वरूपात प्रात्प झाल्या होत्या. सन 2020 मध्ये 10 दिवसांत फिरत्या हौदांमध्ये 20, 540 मूर्ती विसर्जन व संकलन केंद्रावर 24, 013 मूर्ती संकलन असे एकूण 44, 553 गणेश विसर्जन झाले आहे, असेही महापौरांनी सांगितले.

'क्षेत्रिय कार्यालयांतर्गत सर्व आरोग्य कोठ्याच्या ठिकाणी व गणेश मंडळाच्या ठिकाणी सर्व नागरीकांस अमोनियम बायकार्बोनेट पावडरचे वाटप करण्यात आले आहे. प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयास सरासरी 10 टन अमोनियम बायकार्बोनेट वितरीत करण्यात आले आहे, अशीही माहिती महापौर मोहोळ यांनी दिली.

Published by: Akshay Shitole
First published: August 31, 2020, 11:09 PM IST

ताज्या बातम्या