मराठी बातम्या /बातम्या /पुणे /कसब्यातील पराभव भाजपच्या जिव्हारी, नेतृत्त्व बदल होण्याची शक्यता, या नावांची चर्चा

कसब्यातील पराभव भाजपच्या जिव्हारी, नेतृत्त्व बदल होण्याची शक्यता, या नावांची चर्चा

कसबा पोटनिवडणूक 2023

कसबा पोटनिवडणूक 2023

कसब्यातील पराभव भाजपच्या जिव्हारी लागला असून नेतृत्त्वात बदल होण्याची शक्यता आहे.

पुणे, 9 मार्च : राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. 'कसबा पेठ' या भारतीय जनता पक्षाच्या पारंपरिक बालेकिल्ल्याला खिंडार पडले. याठिकाणी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा 10 हजार 915 मतांनी पराभव करून 'कसब्यात कमळच' या अतिआत्मविश्वासाच्या पाकळ्या पूर्णत: विखरून टाकल्या.

शहर भाजपात बदल होणार?

आता कसबा पोटनिवडणूकीच्या पराभवानंतर शहर भाजपकडून राज्य कार्यकारिणीला अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये शहर भाजपच्या नेतृत्वात बदलाचे संकेत दिसत आहे. तीन वर्ष शहराध्यक्ष असलेल्या जगदीश मुळीक यांची उचलबांगडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर त्यांच्याजागी आमदार सिध्दार्थ शिरोळे किंवा माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची नावे नव्या शहराध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील सर्व शहर, जिल्हा संघटनांमध्ये तातडीने बदल करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या महिनाअखेरीस शहर भाजपमध्येही मोठ्या प्रमाणात बदल करण्याचे संकेत आहेत. कसबा पेठ पोटनिवडणुकीतील पराभवामुळे पुणे शहरातील बदलांना महत्त्व प्राप्त झाल्याचा गौप्यस्फोट भाजपमधील एका ज्येष्ठ नेत्याने केला आहे.

चिंचवडमध्ये राष्ट्रवादीलाच का मिळाली उमेदवारी? काय होतं महाविकास आघाडीचं गणित?

रवींद्र धंगेकरांच्या विजयावरून शरद पवारांनी उडवली फडणवीसांची खिल्ली - 

भाजपचा कसब्याचा गड ढासळला आहे. चांगली गोष्ट आहे, विजयी उमेदवार हे आमच्या सर्वांचे होते, हे त्यांनी मान्य केलं हे चांगलं झालं. निवडणुकीच्या आधी त्यांची विधान काय होती, भाषणात काय होती. कमीत कमी निवडून आलेली व्यक्ती याच्याबद्दल ते चांगले बोलत आहे, ही चांगली गोष्ट आहे, असा टोला पवारांनी फडणवीसांना लगावला.

'धंगेकरांना यश मिळेल असं लोकांकडून ऐकायला मिळत होतं. पण माझ्या मनात शंका होती. कारण नारायण, सदाशिव आणि शनिवार पेठ. याच्या खोलात जायची गरज नाही. परंतू गिरीष बापटांनी कसब्यात सर्वपक्षीय नेत्यांशी संबंध ठेवले. त्यामुळे कसबा इतके दिवस अवघड होता. पण यावेळी भाजपने बापटांना विश्वासात घेतलं की नाही माहित नाही पण धंगेकरांनी ही जागा काढली, असंही पवार म्हणाले.

First published:
top videos

    Tags: BJP, Devendra Fadnavis, Election, Maharashtra politics, Pune, Pune news